एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री ते शेतकरी..हि मराठमोळी अभिनेत्री आता आपल्या गावी करतेय शेती, मुलगीही आहे अभिनेत्री..

शेती म्हणजे खूप कष्टाचं काम, असा समज असल्याने सहसा त्याच्या वाटेला कुणी जात नाही. काही केवळ आवड म्हणून गावी जाऊन शेती करतात. एक अभिनेत्री मात्र अशी आहे जिने सर्व समज खोडून काढत शेतीला आपला व्यवसाय बनवलं आहे.

संपदा कुलकर्णी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. एक उत्तम सूत्रसंचालिका आणि अभिनेत्री असलेली संपदा एक दिग्दर्शिकाही आहे.

मग चंदेरी दुनियेतून ही अभिनेत्री अचानक शेतात चिखल तुडवायला का गेली असेल बरं? वयाच्या चाळीशी नंतर संपदा कुलकर्णी आणि तिचे पती राहुल कुलकर्णी यांनी आपले प्रोफेशन बदलायचे ठरवले.

संपदाचे पती राहुल हे जे जे स्कूल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी असून गेली काही वर्षे ते जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करत होते. शेतीच करायची या हट्टापायी त्यांनी कोकणातल्या आपल्या फुणगूस गावाचा रस्ता धरला. तेथे कोकणी पद्धतीचे घर बांधले. इथून पुढे सुरू झाला संपदाचा एक शेती उद्योजिका म्हणून प्रवास.

डोंगरावरच्या वडिलोपार्जित जमिनीची मशागत करून तिथे पीक घेण्यास सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे हे दोघे शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करतात. त्यांच्या कष्टाचं चीज झालं आणि त्यांच्या शेतातला भाजीपाला थेट मुंबईच्या बाजारात जाऊन पोचला. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आणि आंबा, काजूसारखी फळे यांना मागणी वाढू लागली.

त्यापुढे जाऊन संपदा आणि राहुल यांनी त्यांच्या शेताचं नामकरण ‘आनंदाचं शेत’ (Farm of Happiness) असं करत चक्क ऍग्रो टुरिझम चा व्यवसाय सुरू केला. अर्थातच त्यांच्या या अभिनव कल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता हे दोघे मिळून ‘शेती कशी करावी’ यावर ऑनलाईन शिबिर देखील घेतात.

पुढच्या पिढीने देखील शेतीकडे केवळ कष्टाचे काम म्हणून न पाहता त्याचे व्यवसायात रूपांतर करावे, हा या शिबिरांमागचा उद्देश आहे. या शिबिरांना लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

संपदा आणि राहुल यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे शर्वरी कुलकर्णी. ती मराठी नाटके तसेच मालिकांमधून काम करते. ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत तिने मीरा ची भूमिका केली होती.

नुकताच तिचा विभव बोरकर याच्याबरोबर मार्चमध्ये विवाह पार पडला. शर्वरीने ललित कला केंद्रामधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिला नृत्य आणि पाककला यांचीदेखील आवड आहे.

You might also like