एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनंदन! या मराठमोळ्या दिग्दर्शकाची आता बॉलिवूडकडे वाटचाल, अभिनेता कार्तिक आर्यन असेल मुख्य भूमिकेत..

मराठी मनोरंजन सृष्टीतील स्टार्स बॉलिवूड मध्ये जाण्याचे प्रमाण आपल्याकडे बरेच आहे. काहींचे प्रयोग फसतात तर काही आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होतात. आता प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस देखील बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू करतो आहे. अर्थातच तो अभिनयाचा नसून त्याचे प्रभुत्व असलेल्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आहे. याबाबतची माहिती समीरने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केली आहे.

दिग्दर्शक आणि लेखक असलेला समीर विद्वांस याने मराठी चित्रपटसृष्टीत बरेच काम केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘टाइम प्लीज’. उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. चित्रपट तुफान चालला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans)

२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘डबल सीट’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. समीरचा २०१६ ला आलेला ‘वाय झेड’ वेगळ्या धाटणीचा असला तरी लोकांना तो प्रचंड आवडून गेला. २०१७ मध्ये ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

समीरने त्यानंतर दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपट दिले. आनंदी गोपाळ (२०१९), धुरळा (२०२०) आणि आलटून पालटून (२०२१) हे त्याचे गाजलेले चित्रपट. २०१७ मध्ये समीर ने ‘योलो- यू ओन्ली लिव्ह वन्स’ या टीव्ही मालिकेचेही दिग्दर्शन केले.

‘डबल सीट’ आणि ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटांसाठी समीरने लेखनही केले आहे. ‘पसंत आहे मुलगी’ (२०१६) या मालिकेच्या लेखनामध्येही समीर सामील होता. अशा या स्टार डायरेक्टरने आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकायचे ठरवले आहे. लवकरच समीर एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणार आहे असे त्याने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून सांगितले.

समीर विद्वांसचा ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहेत.

सोशल मीडिया वरून समीरने ही माहिती लोकांना कळवत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या ट्विट मध्ये त्याने लिहिले आहे, “एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans)

२०२२ मध्ये ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. समीरने या चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील सोशल मीडिया वर शेअर केले आहे. समीरच्या या नव्या चित्रपटाच्या घोषणेने प्रेक्षकांना अत्यंत आनंद झाला असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत.

समीरच्या इतर चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षक या चित्रपटावरदेखील भरभरून प्रेम करतील अशी अशा आहे. समीरच्या या नव्या चित्रपटासाठी आमच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा!

You might also like