एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

समंथाचे लग्नाआधी होते या अभिनेत्यावर प्रेम! पण पुढे झाले ब्रेक’अप…

सध्या सगळीकडेच समंथा आणि नागा चैतन्यच्या घट’स्फो’टाची चर्चा सुरू आहे. समंथा आणि नागा चैतन्य दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेली जोडी आहे. त्यांच्या चार वर्षांच्या संसारानंतर त्यांनी काडीमोड घेतला. ऑक्टोबर २०१७ ते ऑक्टोबर २०२१ असा त्यांचा प्रवास होता. त्या आधी त्यांनी २०१० पासून एकमेकांना डे’ट करायला सुरुवात केली होती. तसं पाहायला गेलं तर त्यांचं नातं जवळपास एक दशकाहूनही जास्त आहे. मात्र अखेरीस त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं.

समंथाचे सासरे म्हणजे प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र जे होणार होतं ते कोणीच थांबवू शकणार नव्हतं. अखेर समंथा आणि नागा चैतन्य वेगळे झाले. समंथाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की नागा चैतन्यशी लग्न झाल्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजते. मात्र तिचे हे भाग्याचे दिवस फार काळ टिकू शकले नाहीत.

तुम्हाला माहीत आहे का? नागा चैतन्यशी लग्न करण्यापूर्वी समंथा रूथ प्रभू एका दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती. या अभिनेत्या बरोबर असलेल्या तिच्या नात्याच्या बाबतीत ती खूप सिरीयस होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तिला त्याच्याशी लग्न देखील करायचे होते. मात्र दोघांमध्ये ब्रे’क’अप झालं आणि समंथाचं त्याच्याशी लग्न करण्याचं स्वप्न तिथेच संपून गेलं. कोण होता बरं हा अभिनेता? तो होता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ.

समंथा आणि सिद्धार्थची ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि दोघे एकत्र फिरताना दिसू लागले. दोघेही आपल्या नात्याबद्दल गंभीर होते, मात्र दोघांनीही कधी आपल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले नव्हते. जवळपास दीड वर्षं दोघे लि’व्ह-इन रिले’शन’शिपमध्ये होते. नंतर मात्र गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. दोघांमध्ये ब्रे’क’अ’प झालं. ब्रे’क’अपचं नक्की कारण कळू शकलं नाही.

एका मुलाखतीत नंतर समंथाने यावर बोलताना सांगितले, की ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप अड’च’णीं’चा सामना केला आहे. त्या नात्याच्या सुरुवातीलाच काही गोष्टी समजल्याने मी पुढे जाऊ शकले. पुढे काहीतरी वा’ई’ट होणार आहे याची मला चाहूल लागली होती. मी देवाची आभारी आहे, की मला चैतन्यसारखा नवरा मिळाला.’

सिद्धार्थने तमिळ आणि तेलगू चित्रपटांबरोबरच रंग दे बसंती, चश्मेबद्दूर, स्ट्रायकर सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. समंथा आणि नागा चैतन्यच्या घट’स्फो’टा’नंतर आता समंथाचा भूतकाळ समोर येऊ लागला आहे.

You might also like