एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

समंथाचा पतीसोबत वा’द; आयुष्यात नवीन पाहुण्याचे आगमन..

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सिरीज द्वारे समंथाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिची या वेब सिरीज मधील भूमिका बरीच गाजली. समंथा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

२०१७ मध्ये समंथाने सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य बरोबर लग्नगाठ बांधली. नागा चैतन्य देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात अभिनेता आहे. लग्नानंतर समंथा आणि नागा चैतन्य हे दोघेही क्यूट कपल म्हणून ओळखले जाऊ लागले.

अलीकडे मात्र या दोघांच्या वेगळे होण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अशातच समंथाने आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. नाही नाही, हा कुणी तिचा बॉय’फ्रेंड नाही किंवा तिच्या प्रे’ग्नन्सी’ची देखील न्यूज नाही. तर ही आहे तिच्या घरी आलेल्या नव्या कुत्र्याची न्यूज. समंथाच्या घरी आधीपासूनच ‘हॅश’ नावाचा बुलडॉग जातीचा एक कुत्रा आहे. आता तिने ‘साशा’ या नव्या कुत्रीला घरी आणले आहे. या दोघांबरोबरचे आपले फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

insta//samantharuthprabhuoffl/

‘साशा’ खूपच गोंडस आहे. साशा ही हॅश ची बहीण असल्याचेही समंथाने आपल्या या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे. या दोघांबरोबरचे दोन फोटो तिने सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत.

insta//samantharuthprabhuoffl/

एका फोटोमध्ये साशा समंथाच्या मांडीवर बसली असून समोरच हॅश देखील बसला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये साशा निवांत जमिनीवर पहुडलेली पाहायला मिळत आहे. या दोघांमुळे आपल्याला अजिबात विश्रांती घेता येत नाहीये, असेही समंथाने आपल्या पोस्ट मध्ये गमतीने लिहिले आहे. चाहत्यांनी तिला तिच्या नव्या फॅमिली मेम्बरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

समंथा आणि नागा चैतन्यच्या बाबतीत बोलायचं तर दोघांनी अजून त्यांच्या वेगळे होण्याच्या अधिकृत बातम्या दिलेल्या नाहीत. मात्र एका मुलाखतीत तिला याबाबत विचारले असता तिने सांगितले, की गॉसिप हा कलाकारांच्या आयुष्याचाच एक छोटासा भाग आहे आणि वा’दवि’वादांमुळे ती आपले मनःस्वास्थ्य बिघडवून घेत नाही. नागा चैतन्यची मात्र या दोघांच्या नात्यातील तफावतीबद्दल काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

You might also like