एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घट’स्फो’टावर होणार का शिक्कामोर्तब? ‘हे’ कारण आहे घट’स्फो’टाचे..

दाक्षिणात्य स्टार जोडी समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात सध्या सारे काही आलबेल नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या दोघांचा घट’स्फो’ट होणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पसरत आहेत. जरी या दोघांनीही यावर अजून काही अधिकृत भाष्य केलेले नसले तरी घडलेल्या काही घटनांमुळे या दोघांचा घट’स्फो’ट होणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत.

समंथा सध्या प्रसार माध्यमांना मुलाखत देणे टाळत असल्याचे दिसत आहे. मागे दिलेल्या एका मुलाखतीत तिला तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्यावर प्रश्न विचारला असता त्यावरही तिने सरळ उत्तर देणे टाळले होते.

समंथा आणि नागा चैतन्याच्या या घट’स्फो’टाच्या बातम्यांवरून त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण दिसत आहे. समंथाने आपल्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्स वरून ‘अक्किनेनी’ हे नाव काढून टाकल्याने या दोघांच्या वेगळे होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच समंथा तिचे सासरे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जेवणासाठी उपस्थित नसल्याने या गोष्टीला दुजोरा मिळत आहे. २०१० मध्ये समंथा आणि नागा चैतन्यने एकमेकांना डे’ट करायला सुरुवात केली. ३४ वर्षीय या अभिनेत्रीने २०१७ मध्ये नागा चैतन्य बरोबर लग्नगाठ बांधली होती.

समंथाने ‘फिल्म कंपॅनियन’ ला दिलेल्या मुलाखतीत ‘मी ११ वर्षं काम करते आहे, त्यामुळे आता मला ब्रेक हवा आहे’ असे सांगितले. आता हा ब्रेक केवळ कामातून हवा आहे की नात्यातूनही हे कळायला काही मार्ग नाहीये. सध्या कोणत्याही प्रसारमाध्यमांनी तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता ती तो टाळताना दिसत आहे.

सध्या समंथा आणि नागा दोघेही मॅरेज कौन्सलरची मदत घेत आहेत, असे वृत्त आहे. तसेच नागार्जुन देखील आपल्या मुलाचा आणि सुनेचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

समंथा आणि नागा चैतन्य मधल्या बेबनावाचे नक्की कारण समजू शकलेले नाही. मात्र एका ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणी प्रमाणे एक कारण समोर येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी जगन्नाथ गुरुजी यांनी या दोघांच्या घट’स्फो’टाबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. ते म्हणाले, “समंथाला तिच्या करिअर वर लक्ष केंद्रीत करायचे आहे, तर नागा चैतन्य त्याच्या कुटुंबाला प्राधान्य देतो. समंथाच्या या निर्णयामुळे दोघांमध्ये घट’स्फो’ट होऊ शकतो.” समंथा किंवा नागा चैतन्य कडून याबाबत अधिकृत वक्तव्य आल्यानंतरच या गोष्टीचा निकाल लागू शकतो.

You might also like