एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर घट’स्फो’ट! समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार कायमचे वेगळे…

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य जोडी अखेर वेगळी होणार असल्याच्या वृत्ताने प्रसार माध्यमांचे रकाने भरून गेले आहेत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि अभिनेता नागा चैतन्य अखेर घट’स्फो’ट घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या वेगळे होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्यामुळे दोघांचेही चाहते चिंतेत होते. आता त्यांनी अखेरीस आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला असून या दोघांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

२०१० मध्ये एका तेलगू चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर समंथा आणि नागा चैतन्य एकमेकांना डे’ट करू लागले होते. दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने अखेर जानेवारी २०१७ मध्ये दोघांनी हैद्राबाद येथे साखरपुडा उरकून घेतला. पुढे ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी गोव्यामध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२१ मध्ये या दोघांनी आपल्या घट’स्फो’टाबद्दल जाहीर घोषणा केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

जुलै २०२१ मध्ये समंथाने आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून आपले ‘अक्किनेनी’ हे सासरचे आडनाव काढून टाकल्यानंतर अनेक जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यामध्ये गोष्टी ठीक नसल्याचे बोलले जाऊ लागले. या दोघांचे नाते सुधारावे म्हणून समंथाच्या सासऱ्यांनी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी देखील मध्यस्थी केली होती. दोघे मॅरेज कन्सल्टन्ट कडे देखील जात होते. मात्र कोणत्याच गोष्टीचा फायदा झाला नाही आणि अखेर या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

समंथाने याबाबत आपल्या सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत आपल्या घट’स्फो’टाची अधिकृत घोषणा केली आहे. यात ती म्हणते, “आमच्या सगळ्या हितचिंतकांना आम्ही सांगू इच्छितो, की बऱ्याच चर्चा आणि विचार केल्यानंतर मी आणि चैतन्यने नवरा-बायको म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने, आमच्यामध्ये एक दशकापेक्षा जास्त असलेली मैत्री ही आमच्या नात्याचा पाया होती आणि यापुढेही ती अखंड राहील. आम्ही आमचे चाहते, हितचिंतक आणि प्रसार माध्यमे यांना आमच्या या अवघड काळात आम्हाला आधार देण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी हवी असलेली प्रायव्हसी देण्याची विनंती करतो.”

समंथा आणि नागा चैतन्य या दोघांच्या चाहत्यांना या बातमीने खूप दुःख झाले आहे. समस्त चाहत्या वर्गामध्ये समंथा आणि नागा चैतन्य च्या ४ वर्षांनंतर संपुष्टात आलेल्या संसाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. नागा चैतन्यबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

You might also like