एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देव तारी त्याला कोण मारी! आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला असा बनला रातोरात करोडपती..

आपल्या महाराष्ट्रात खूप साऱ्या नवनवीन गोष्टी घडत असतात. त्यामुळे महाराष्ट्राकडे खूप वेगळ्या नजरेने पाहिले जाते इथे काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या आणखी एक न्यूज व्हायरल होताना दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा आणखी एक अनोखी गोष्ट झाल्याचे समजते आहे. सध्या टिव्हीवर एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे आयपीएल! गणपती गेला आणि आयपीएल सुरू झाले.

यावेळी दुसऱ्या भागातील आयपीएल दुबईत होत आहे. सध्या आयपीएलमध्ये खूप सारी रंगत वाढलेली दिसून येत आहे सोशल मीडियावर स्वतःच्या टीमला सपोर्ट केला जात आहे. यामध्ये काही रुसवी फुगवी भांडण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतील.

सध्या आयपीएलच्या हंगामात प्रत्येक खेळाडू आपली जादू दाखवताना दिसून येत आहे. सध्या आयपीएलच्या सामन्यात सीएसके फॉर्मात आहे चांगले प्रदर्शन दाखवून चेन्नईने प्ले ऑफ फेरीत दाखल झाली आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट झाली आहे. या आयपीएलच्या हंगामात सर्वजण ड्रीम ११ वरून पैसे मिळवत असतील पण याहुनही जास्त आयपीएलचा फायदा एका न्हाव्याला झाला आहे. या आयपीएलमुळे तो रातोरात खूप साऱ्या रुपयांचा मालक झाला आहे.

सध्या ही बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. या बातमीमुळे सोशल मीडियावर खूप सारे यूजर अभिनंदन वजा माझे नाव आले असते तर बरे झाले असते असे म्हणत आहेत. पण हा न्हावी एका रात्रीत कोट्यवधी रुपयांचा मालक कसा झाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही कारण तुम्हीही या मार्फत पैसे मिळवत असाल.

अरबिया संग्रामचा रहिवासी अशोक असे या व्यक्तीचे नाव आहे. अशोक एका रात्रीत करोडपती झाला. पण हा न्हावी व्यवसाय करणारा अशोक हा न्हावी काम करता करता कसा काय एवढ्या रुपयांचा मालक बनला. झाले असे की आपल्या दुकानाच्या बाहेर बसून त्याने ड्रीम ११ ला आयपीएलची मॅच लावली होती ज्यात तो करोडपती झाला.

माहितीनुसार या व्यक्तीस रविवारी जॅकपॉट लागल्याचे समजते, चेन्नई विरुद्ध कोलकाता या सामन्यात त्याने पन्नास रुपये फक्त गुंतवले होते. या मॅच वेळी त्याने रात्री आपला संघ बनवून ठेवला होता. त्याला स्वप्नांत सुद्धा माहीत न्हवते की त्याने तयार केलेला संघ जादू करून जाईल.

अशोक यांनी तयार केलेल्या संघातील प्रत्येक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. माहितीनुसार अशोक यांना ७० लाख रुपये मिळणार आहेत. या रक्कम बद्दल त्यांना अधिकृत कॉल देखील आला होता. १ कोटी मधील तीस टक्के रक्कम कापल्यानंतर त्यांना ७० लाख रुपये मिळणार आहेत अशोक यांचे स्वतःचे केस कापण्याचे दुकान आहे. अशोक म्हणाले की पैसे मिळाले की आधी मी कर्ज फेडेन आणि घर बांधेन. अशोक यांना जेव्हा लॉटरी लागली तेव्हा ते रात्रभर झोपले नाहीत.

You might also like