एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता इतक्यावर्षानंतर अशी दिसते ‘छोटे मियां’ रियालिटी शोमधील गंगूबाई, दिसते खूपच बोल्ड..पहा

छोट्या पडद्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावरचे विविध रिअ‍ॅलिटी शोज हे आहे. अनेक प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कलाकारांना समोर आणण्यासाठी अनेक प्रकारचे रिअॅलिटी शोज छोट्या पडद्यावर सतत येताना दिसतात. यातले अनेक कलाकार प्रेक्षकांच्या दीर्घकाळासाठी लक्षात राहतात.

अनेक कलाकार सेलिब्रिटीही होतात तर अनेक जण तसेच मागे राहून जातात. यामागे नक्की काय कारण असतं हे ठामपणे सांगता येणार नाही. पण या बदलाची नोंद मात्र सगळ्यांना घ्यावीशी वाटते. चाहते हे फार आवडीने त्यांच्या आवडलेल्या कलाकारांच्या प्रवासाचा आढावा घेताना दिसतात. अशाच एका कलाकाराचा छोट्या पडद्याच्या लाईमलाईट नंतरचा खरा रिअ‍ॅलिटी चेक देणारा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत.

छोटे मियां नावाचा एक रिअॅलिटी शो एके काळी खूप गाजला होता. यात अनेक बाल कलाकारांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने आणि विनोदाच्या टायमिंगने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. बरेच गायनाचे आणि नृत्याचे शोज येत राहतात पण अभिनयासाठी फार कमी शोज येताना दिसून येतात. यातलाच हा एक शो. या शो मधले जज ही प्रसिद्ध अभिनेते होते. याच शो च्या एका सिझन मधलं अत्यंत प्रसिद्ध कॅरेक्टर म्हणजे गंगूबाई.

गंगूबाई हे कॅरेक्टर लोकांना प्रचंड आवडलं होतं आणि आजही लक्षात आहे. गंगूबाईचे नखरे, तिचा विनोदाचा टायमिंग, गुबगुबीत गाल आजही अनेकांना आठवतात. गंगूबाई म्हटल्याबरोबर हिरव्या बांगड्या भरलेली, हिरवं लुगडं नेसलेली एक खमकी बाई डोळ्यांसमोर येते म्हणजे येतेच.

हीच ओळख गंगूबाई या पात्राने मनामनात रुजवली होती. ती जेंव्हा तिच्या मोठ्या आवाजात भाजी विकायची किंवा कुणाला काहीतरी उपदेश द्यायची तेंव्हा त्या प्रसंगातली मजा बघायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असायचे.

या लहान गंगूबाईचे खऱ्या आयुष्यातले नाव सलोनी दायिनी असे आहे. हा शो संपल्यानंतर काही छोट्या मोठ्या चित्रपटात तिने भूमिका केल्या. पण हळूहळू ती गायब झाली. तिचा निरागसपणा वयाप्रमाणे कमी कमी होत गेला आणि लोकांना मग ती तितकी लक्षात राहिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni (@salonidaini_)

तिला तशी कामही मिळाली नाहीत. हा शो सोडल्यानंतर तिचे वजन खूप वाढले. वजन ही गोष्ट फक्त काही मर्यादेपुरतीच आपल्या हातात असते. पण आपल्याकडे नेहमीच या मुद्द्यावरून राळ उडवली जाते. चिडवले जाते. बाऊ केला जातो.

गंगूबाई अर्थात सलोनी ही जेंव्हा जेंव्हा सोशल मिडीयावर तिचा फोटो शेअर करायची तेंव्हा त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स यायच्या. “अशीच खात राहिलीस तर म्हशीसारखी टम्म फुगशील” अशीही कमेंट तिच्या पोस्टवर एकाने केली होती. यामुळे ती खूप नाराज झाली. तिला खूप वाईट वाटले.

अशाप्रकारच्या विचारसरणीची चीडही तिला आली असणार पण तिने यावर स्वतःच्या कामातून उत्तर दिले. योग्य व्यायाम, डायट आणि संयमाच्या जोरावर सलोनीने स्वतःच्या वजनाला कंट्रोलमधे आणले. आता ती अत्यंत सुंदर दिसते आहे. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोजमधून तुम्ही तिने आणलेले परिवर्तन अनुभवू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni (@salonidaini_)

खरे तर “कुछ तो लोग कहेंगे” असे म्हणत आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. एखाद्याच्या वजनावरून त्याला जज करणं अत्यंत चूकीचं आहे. जाडीतही सौंदर्य किंवा टॅलेंट लपलेलं असतं. त्यामुळे कुणाला अशाप्रकारे या मुद्द्यावरून कधीही हिणवू नये. सलोनी आपल्याला हेच शिकवले आहे.

You might also like