एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमान खानला मिळाली चिरंजीवीसोबत चित्रपटाची ऑफर, ‘या’ चित्रपटात दिसणार दोघे एकत्र..

बॉलिवूडपेक्षाही एक पाय पुढे असणारे दाक्षिणात्य चित्रपट याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, मागील काही वर्षभरात बाहुबली आणि केजीएफ यांसारख्या चित्रपटाने हिंदी प्रेक्षकांना सुद्धा दाक्षिणात्य चित्रपटाच्या प्रेमात पडायला लावलं.

दाक्षिणात्य चित्रपटानी बॉलिवूड सोबत चांगलीच मोठी स्पर्धा निर्माण केली आणि ते खरे करून दाखविले की करियर फक्त बॉलिवूडच घडवत असे नाही. त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली दाक्षिणात्य चित्रपटात खूप साऱ्या सुपरहिट कलाकारांनी कामे केली आहेत. अश्या यादीत आता बॉलिवूड मधील किंग सलमान खान यांचा देखील समावेश होणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात सध्या एक नवीन चित्रपट तमाम रसिक प्रेक्षकांनसाठी भेटीस येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांच्या चित्रपटात सलमान खान दिसणार आहेत या चित्रपटात चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहेत. चिरंजीवी यांनी लुसिफर या चित्रपटावर हिंदी रिमेक बनवण्याचे ठरवले आहे. ‘लुसिफर’ मध्ये सलमान आणि चिरंजीवी झळकणार आहेत, हे श्रोत्यांना समजल्यावर सगळीकडे हीच चर्चा सध्या होत आहे.

चिरंजीवी यांच्या १५३ व्या चित्रपटात सलमान खानने चित्रपट करण्याची ऑफर स्वीकारून चिरंजीवी यांच्या एका चित्रपटाचा ते देखील भाग होतील. लुसिफर या चित्रपटात सलमान खान एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पण अजून ती महत्वाची भूमिका कोणती असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. चिरंजीवी आणि सलमान यांचे नातेसंबंध घरापासून जवळचे आहेत असे म्हणतात. पण या चित्रपटात जर चिरंजीवी सोबत सलमान दिसला तर ते आश्चर्यचकित करणार असेल.

सलमान खान याचा ‘राधे’ हा चित्रपट पडल्यानंतर तो आपली अभिनेत्री कॅटरिना कैफ बरोबर रशियात टायगर-३ चे शूटिंग करत आहे असे म्हंटले जाते. या चित्रपटाचे भाग खूप वेगवेगळ्या ठिकाणी शूट केले जाणार आहेत असे म्हंटले जाते या चित्रपटासाठी तो सध्या व्यस्थ आहे. पण चिरंजीवी सलमान यांना चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकांनची हूर लागली आहे.

You might also like