एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘समांतर २’ फेम अभिनेत्री तेजस्विनी पंडीतची सख्खी बहीण पाहिली का? दोघी दिसतात अगदी सेम टू सेम..

‘अगं बाई अरेच्चा!’ (२००४) सारख्या मराठी चित्रपटातून खलनायकी भूमिकेत आपल्याला भेटलेली सुंदर नायिका म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत. ‘अगं बाई अरेच्चा!’ चित्रपटातून तेजस्विनीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

गैर (२००९), मी सिंधुताई सपकाळ (२०१०), टार्गेट (२०१०), रानभूल (२०१०), वावटळ (२०१०), एक तारा (२०१५), तू ही रे (२०१५), ७ रोशन व्हिला (२०१६), देवा (२०१७), ये रे ये रे पैसा (२०१८) यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत तिने काम केले आहे. रखेली (२००८) आणि वैशाली कॉटेज (२०१२) यांसारख्या नाटकांमध्ये देखील तिने भूमिका निभावल्या आहेत.

तेजस्विनी सध्या ‘समांतर २’ या वेब सिरीज मध्ये काम करत आहे. तिने या आधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. लज्जा (२०१०), एकाच या जन्मी जणू (२०११), कालाय तस्मै नमः (२०१३), १०० डेज (२०१६) या तिच्या काही गाजलेल्या मालिका. ‘१०० डेज’ मधील तिच्या ‘राणी’ च्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. नवरात्रीच्या नऊ अवतारांची तिच्यावर साकारण्यात आलेली थीम बरीच चर्चेत राहिली.

अभिनयाचे हे बाळकडू तेजस्विनीला तिच्या आईकडून मिळाले आहे. तेजस्विनीची आई देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ज्योती चांदेकर असे त्यांचे नाव आहे. दोघी मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.

तेजस्विनीला एक थोरली बहीण देखील आहे. तिचे नाव आहे पूर्णिमा पंडीत पुल्लन. मात्र तिचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नसल्याने ती फारशी चर्चेत नसते.

पूर्णिमा टेक्सस मधील ऑस्टिन शहरात वास्तव्यास होती. मात्र काही वर्षांपूर्वीच ती भारतात परत आली. सध्या ती तिच्या कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाली आहे. तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ ब्रॅण्ड बरोबर ती काम करते.

बऱ्याचदा या ब्रॅण्डसाठी तिने स्पेशल असिस्टंट म्हणून काम पाहिले आहे. पूर्णिमा सहसा मीडिया समोर नसते. तिला कुकींगची आवड आहे. ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून नेहमी आपल्या कुकींगचे फोटो शेअर करत असते.

तेजस्विनी आणि पूर्णिमा यांचे खूप कमी फोटो सोशल मीडिया वर पाहायला मिळतात. मात्र हे फोटो जवळून पाहिले असता दोघी बहिणींमध्ये बरेच साम्य असल्याचे लक्षात येते. तसेच या दोघीही दिसायला खूप सुंदर आहेत हे दिसून येते.

पूर्णिमा सहसा लाइमलाईट मध्ये नसल्याने बऱ्याच जणांना तेजस्विनीच्या या मोठ्या बहिणीबद्दल माहीत नाहीये. तशा इंडस्ट्री मध्ये बहिणी-बहिणींच्या बऱ्याच जोड्या आहेत, पण त्या एकाच क्षेत्रात असल्याने प्रसारमाध्यमांना त्यांच्याबद्दल माहिती असते.

You might also like