एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट’ चित्रपटामध्ये पारश्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री पहा..आता दिसते अशी..

२०१६ मध्ये ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने मराठी चित्रपटाचे सर्व विक्रम मोडीत काढले. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने १०० कोटीच्या वर गल्ला जमवला. या चित्रपटाचे रिमेक देखील निघाले. तमिळ मध्ये याचा रिमेक बनवला गेला, तसेच ‘धडक’ या नावाने हिंदी मध्येही या चित्रपटाचा रिमेक बनला. भारतभर तर या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवलीच, पण हा मराठी चित्रपट साता समुद्रापार देखील जाऊन पोचला.

या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि संगीत या जशा आकर्षक बाजू होत्या, तशीच अजून एक जमेची बाजू होती ती म्हणजे यातले कलाकार. या कलाकारांचा अभिनय पाहिला तर कोणी म्हणूच शकत नाही की यातले बरेच कलाकार हे नवखे आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या कलाकारांमध्ये कुणीही अनुभवी कलाकार घेतले नव्हते.

ऑडिशनद्वारे नवीन चेहरे निवडले गेले आणि मग त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. नागराज यांनी दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी करत या कलाकारांकडून त्यांच्या भूमिका नीट वठवून घेतल्या.

‘सैराट’ चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. तसेच यातल्या कलाकारांनादेखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटात आकाश ठोसर ने ‘परश्या’ या मुख्य नायकाचे पात्र साकारले आहे, तर रिंकू राजगुरू ला आपण ‘आर्ची’ या प्रमुख नायिकेच्या भूमिकेत पाहिलं आहे. या चित्रपटात अजून एक भूमिका लक्षात राहिली ती म्हणजे परश्याच्या आईची. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे वैभवी परदेशी.

वैभवीने परश्याच्या आईची भूमिका खूप उत्तम प्रकारे साकारली आहे. वैभवीने ‘सैराट’ चित्रपटात काम करण्याआधी ‘कम्पलसरी हेल-मेट’ (२००६) या शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं होतं. ‘सैराट’ मधील भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फायरब्रँड’ या चित्रपटातदेखील काम केले आहे. वैभवी परदेशी ने ललित कला केंद्रामधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. २७ मार्च १९८६ रोजी जन्मलेली वैभवी पुण्यात राहते.

वैभवीला असेच उत्तम चित्रपट मिळत राहोत आणि ती असाच छान अभिनय करत प्रेक्षकांचे मन जिंकत राहू दे यासाठी वैभवीला आमच्या टीम कडून शुभेच्छा! लवकरच आपल्याला वैभवीचे अनेक उत्तम चित्रपट पाहायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. बाकी तुम्हाला अशा मनोरंजक गोष्टी सांगायला आम्ही आहोतच. आमचे लेख नियमितपणे वाचत चला आणि आवडल्यास जरूर लाईक करा. तसेच आमचे लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like