एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आश्चर्यजनक; सैराट मधील लंगड्याने केले न्यू’ड फोटोशूट, फोटो झाले व्हायरल फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

सैराट या सिनेमाच्या माध्यमातून साईड रोल मधे असूनही सर्वांच्या लक्षात राहणारा लंगड्याची भूमिका साकारणारा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड तोडून टाकले होते. आजही या चित्रपटाची आवर्जून चर्चा केली जाते.

बऱ्याच अंगांनी हा चित्रपट समाजावर उत्तम भाष्य करत असल्याने समिक्षक तसेच रसिक प्रेक्षक यांच्याकडून नागराज मंजुळे आणि समस्त सैराट टिमचे कौतुक होत राहते. या चित्रपटाने अनेक अवॉर्ड पटकावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanaji Galgunde (@tanajigalgunde)

सैराट या चित्रपटात परशा नावाचे एक कॅरेक्टर होते. परशाची भूमिका आकाश ठोसर याने केली होती. तर आर्चीची भूमिका रिंकू राजगुरू हीने केली होती. हे दोघे तर प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेच पण अजून एक पात्र लोकांना जाम आवडले. ते म्हणजेच लंगड्या. हो, या सिनेमातील लंगड्या या पात्राने मजा आणली होती.

तो चिठ्ठी उचलण्याचा जो सिन दाखवला गेला आहे तो अजूनही चाहत्यांना पोट धरून हसायला लावतो. याच लंगड्याची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यातलं नाव आहे तानाजी गळगुंडे. तानाजी याने सैराट नंतरही अनेक चित्रपटांतून छोट्या मोठ्या भूमिका केल्या. मॉडेलिंग मधे काम केले. पण याचबरोबर तो स्वतःच्या कामामुळे तरुणांसाठी प्रेरणास्थानसुद्धा बनला आहे.

तानाजी गळगुंडे याने नुकतेच न्यू-ड फोटोशूट केले आहे. एखाद्या पुरुषाने न्यू-ड फोटोशूट करण्याची ही पहिली वेळ नाही. पण असे मराठी अभिनेत्यांच्या बाबतीत फार कमी ऐकायला मिळते. त्यामुळे तानाजीची तुफान चर्चा होत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो संपूर्ण नागडा आहे व त्याने हातात फक्त गिटार धरले आहे.

गिटारमुळे फोटोला एक वेगळाच ग्लो आलेला आहे. त्याचे पीळदार शरीर, चेहऱ्यावरचे हावभाव आणि हातातली गिटार हे सगळच उत्तम जमून आलेलं आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याने हातात गिटारच का धरली आहे? हाच प्रश्न तानाजी यालाही विचारण्यात आला होता.

तुम्हाला हे माहिती नसेल की तानाजी गळगुंडे हा खऱ्या आयुष्यातही दिव्यांगच आहे. हल्ली अपंग असं न म्हणता दिव्यांग असं म्हटलं जातय. ही एक अत्यंत उत्तम गोष्ट आहे. तर अशा दिव्यांगपणाचा मला काहीही तिरस्कार वाटत नाही.. उलट मी ही गोष्ट सकारात्मकपणे घेतो आणि उघडपणे स्विकारतो.

नेमके हेच तानाजीने अशाप्रकारचे फोटोशूट करून अप्रत्यक्षपणे आपल्या सर्व बांधवांना सांगितले आहे. तो म्हणाला की, “माझे पाय योग्य रचनेत नाहीत पण माझं संगीत आहे”. तानाजीला संगीताची प्रचंड आवड आहे. त्याला संगीतामुळे पूर्णत्व आल्यासारखे वाटत असते. त्यामुळेच त्याने या फोटोत फक्त गिटार हातात पकडला आहे.

कुठलाही व्यक्ती जन्मतः नागडाच असतो. त्याला ही दुनिया कपडे घालते. पण कपड्यांमुळे आपलं नागडेपण झाकलं जात नाही. आपल्याला कुठल्यातरी कलेची आवड असली पाहिजे. आपलं काहीतरी कुठल्यातरी क्षेत्रात पॅशन असलं पाहिजे. त्यामुळेच आपलं लौकीक अर्थाने आपलं नागडेपण झाकलं जातं. हा संदेश देणाऱ्या ताणाजी गळगुंडेला खूप शुभेच्छा.

You might also like