एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सैराट चित्रपटानंतर सल्या आणि प्रदीप करणार या मालिकेतून प्रदार्पण! मालिकेचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रानो सध्या बॉलिवूड प्रमाणे मराठी इंडस्ट्रीत सुद्धा खूप फेम आला आहे त्यामुळे आता मराठी इंडस्ट्रीत सध्या खूप सारे नवनवीन प्रोजेक्ट बगायला मिळत आहे मराठी इंडस्ट्री सध्या प्लॅनेट मराठी या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर उतरली आहे. आता नवीन चित्रपट किव्हा मालिका यात तुम्हाला खूप सारे नवीन कलाकार दिसतील बॉलिवूड प्रमाणे मराठी मध्ये फेम, सुंदरता, आकर्षक असे काही विषय बंद झाले आहेत. त्यामुळे मराठी मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्याला प्रथम संधी मिळत असते.

सध्या झी मराठीवरील प्रचंड गाजलेली मालिका कारभारी लयभारी प्रेक्षकांनचा निरोप घेत आहे, याच जागी ‘कारभारी लयभार’ निरोप घेऊन तेजपाल वाघ यांची नवीन मालिका ‘मन झालं बाजींद’, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेत आता तुम्हाला सैराट फेम सल्या आणि प्रदीप आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सल्याची भूमिका साकारणार अभिनेता अरबाज शेख आणि प्रदीपची भूमिका साकारणार अभिनेता तानाजी गलगुंडे हे दोन्ही कलाकार सैराट चित्रपटामुळे खूप जास्त गाजले. पण आता एक नवीन चर्चा समोर येत आहे.

‘मन झालं बाजींद’, या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर गुगल वर बाजींद या शब्दाचा अर्थ सर्वजण पाहत होते. या मालिकेच्या नावावरून मालिकेत खूप इंटरेस्ट असेल असे प्रेक्षकांना वाटत आहे कधी ही मालिका आपल्याला भेटायला येईल याची आतुरता अजून देखील लागली आहे. या मालिकेत तुम्हाला मुख्य कलाकार म्हणूंन श्वेता खरात आणि वैभव चव्हाण दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SHWETA RAJAN KHARAT (@shwetarajan_)

श्वेता खरातने या अगोदर ‘राजा राणीची गं जोडी’, मधून कलर्स मराठीवर पदार्पण केले होत. पण मन झालं बाजींद या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. याआधी वैभव चव्हाण याने स्वराज्यजननी जीजामाता या मालिकेत विरोधी भूमिका निभावली होती. त्याच बरोबर त्याने अगोदर नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

श्वेता आणि वैभव सोबत या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे दिसणार आहेत. सैराट नंतर तानाजी गस्त आणि फ्री हिट दणका या चित्रपटात दिसला होता तर अरबाज या अगोदर तुम्हाला सैराट नंतर फ्री हिट दणका यात दिसला होता. आता ही जोडी तुम्हाला मन झालं बाजींद या मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला येत आहे. आमच्या टीम तर्फे भावी वाटचाली साठी तानाजी आणि अरबाज यांना खूप साऱ्या शुभेच्छा!

You might also like