एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता इतक्या वर्षांनी ‘सैराट’ मधील आर्ची मध्ये झाला आहे इतका बदल, पूर्वीपेक्षा आता दिसते खुच बोल्ड आणि सुंदर..

२९ एप्रिल, २०१६ साली रिलीज झालेला नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘सैराट’ अजून हि लोकांच्या मनामध्ये घर करून आहे. मराठी चित्रपटसुष्टी मधील हा एक बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक हि केला गेला परंतु हा चित्रपट फार काही यश मिळवू शकला नाही.

सैराट चित्रपट येऊन आता ५ वर्ष होऊन गेली आहेत. सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतच़े सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटामध्ये नवीन कलाकारांना काम करण्याची संधी दिली होती, त्यावर कलाकारांनी चांगली भूमिका करून सर्वांचे मन जिंकले. परंतु आता या चित्रपटामधील कलाकारांमध्ये खूप बदल झाला आहे.

या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू(अर्चना पाटील उर्फ ‘आर्ची’) आणि आकाश ठोसर (प्रशांत काळे उर्फ ‘परश्या’) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय तानाजी गळगुंडे (‘लंगड्या’), अरबाज शेख (”सल्या’) यांनी हि उत्तम भूमिका केली होती.

आज आम्ही  तुम्हाला रिंकू राजगुरू म्हणजे तुमची आवडती आर्ची बद्दल बोलणार आहे. ३ जुने २००१ साली अकलूज (सोलापूर) मध्ये जन्मलेली रिंकूने २०१३ मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेऊन सैराट चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली होती. त्यानंतर ३ वर्ष प्रशिक्षण घेऊन तिने २०१६ साली सैराट या चित्रपटामध्ये काम केले.

या चित्रपटानंतर ती रातोरात एक अभिनेत्री म्हणून उदयास आली. चित्रपटानंतर तिने अनेक ठिकाणी भेटी देऊन बक्कळ कमाई केली. मराठी चित्रपटामधील यशानंतर रिंकूने हिंदी, कन्नड भाषामध्ये हि छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. तिने आतापर्यंत कारकिर्दीत मान्सू मिलान्गय २०१७ (कन्नड), कागर २०१९ (मराठी), मेकअप २०२० (मराठी), झुंड २०२० (हिंदी), हंट्रेड वेब सिरीज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आता इतक्या वर्षानंतर रिंकू मध्ये खूपच बदल झाला आहे. ती तिचे फोटो नेहमी इन्स्टा वरती चाहत्यांशी शेअर करत असत. नुकताच तिचा साडी मधील लुक सोशल मीडिया वरती खूप वायरल होत आहे. सैराट चित्रपटाच्या यशानंतर रिंकूने स्वतःमध्ये खूपच बदल केला आहे. यासाठी तिने खूपच कष्ट घेतलेले दिसून येते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like