एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट’ मधील आर्चीची मैत्रीण आनी आठवते का? आता करते ‘हे’ काम..

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाची कमाल काय सांगावी! मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढत आणि काही नवे विक्रम रचत या चित्रपटाने इतिहास घडवला. चित्रपटात काम करणारे सगळेच कलाकार प्रसिद्ध झाले. या चित्रपटातील बरेच कलाकार हे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उभे होते. मात्र तरीही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सगळ्या कलाकारांकडून कमालीची तयारी करून घेतली होती. त्यामुळे पडद्यावर वावरणाऱ्या व्यक्तिरेखा अगदी खऱ्या वाटत होत्या. या व्यक्तिरेखांनी आणि त्या साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

‘सैराट’ मधील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजेच आर्ची आणि परशा तर सगळ्यांच्याच लक्षात आहेत. त्यांना साथ देणारे होते ते त्यांचे मित्रमंडळी. आर्ची आणि परशाच्या मित्रमंडळींमध्ये होते ते सल्या, बाळ्या आणि आनी. या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांनी प्रमुख पात्रांना खरंच खूप भारी साथ दिली आहे. यातील ‘आनी’ ची व्यक्तिरेखा साकारली होती ती अभिनेत्री अनुजा मुळे ने. नेहमी सावलीसारखी आर्ची सोबत असणारी, तिला बाकीच्या गोष्टींबद्दल सांगणारी अशी ही ‘आनी’ ची व्यक्तिरेखा होती.

पुण्यात शिकत असताना अनुजाने एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. यात तिने ‘चिठ्ठी’ या एकांकिकेत काम केले होते. तिला या एकांकिकेतील भूमिकेसाठी पारितोषिक मिळाले. ते पाहून नागराज मंजुळेंनी तिची निवड आपल्या चित्रपटासाठी केली. ‘सैराट’ नंतर खरंतर अनुजाने कोणतेही नवे प्रोजेक्ट्स केलेले नाहीत. त्यामुळे तिचे चाहते ‘ती सध्या काय करते’ असा प्रश्न विचारत आहेत.

अनुजा तशी बऱ्यापैकी सोशल मीडिया वर सक्रीय असते. नुकतेच तिने प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सोशल मीडिया वरील ‘आस्क मी नाऊ’ (Ask Me Now) हे फिचर वापरत तिने प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अनुजा सध्या काय करत आहे, असा प्रश्न एका चाहत्याने विचारल्यावर तिने आपला काळ्या कोटातील एक फोटो पोस्ट केला. आपला वकिलाच्या कपड्यातील फोटो तिने उत्तरादाखल पोस्ट केला. त्यावर तिने लिहिले आहे, की ‘हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यांसाठी- वकिली’.

दुसऱ्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला, की ‘तुझं शिक्षण किती झालंय?’ त्यावर तिने आपलं पदव्युत्तर शिक्षण झाल्याचं सांगितलं. तिने नुकतीच वकिलीमध्ये ‘मास्टर्स’ ही पदवी मिळवली आहे. तिचे सहकलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर सारखं तिने अभिनयाची वाट न निवडता वेगळी वाट निवडली आहे.

You might also like