एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वेस्टर्न ड्रेस मध्ये सई ताम्हणकर करतेय शाईन! हॉ’ट अंदाज होतोय व्हायरल…

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बरीच चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘मिमी’ हा हिंदी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मराठी मालिका, मग मराठी चित्रपट करत सईने हिंदी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. हंटर, लव्ह सोनिया असे चित्रपट तिने केले. या चित्रपटांनी तिला हिंदी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली. आज मराठी आणि हिंदी असे दोन्ही वर्गातले प्रेक्षक तिचे चाहते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सई सोशल मीडिया वर सक्रीय असते. आपले वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडिया वर अपलोड करत असते. नुकतेच तिने आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आणि सोशल मीडिया वर आगच लागली. तिच्या या हॉ’ट फोटोंनी चाहत्यांना पार वेड लावून टाकलं आहे. सई दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही लोक चाहते आहेत.

सईने आपले वेस्टर्न ड्रेस मधील काही फोटो शेअर करत त्यावर ‘शायनिंग ब्राइट’ अशी कॅप्शन टाकली आहे. तिने या फोटोमध्ये सोनेरी रंगाचा शॉर्ट वन पीस घातला आहे. यावर तिने कोणतीही ऍक्सेसरी घातलेली नाही. मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या झगझगीत गोल्डन ड्रेस वर लाल, जांभळ्या, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची मोठी फुले आहेत. तिचे क्लोजअप फोटो चाहत्यांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सईने अलीकडेच ‘समांतर २’ या वेब सिरीज मध्ये देखील काम केलं होतं. गुलदस्त्यात असलेल्या तिच्या या भूमिकेने लोकांना बरेच दिवस कुतुहलात ठेवलं होतं. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यकार्यक्रमाची जज म्हणून काम बघते आहे. छोटा पडदा असो वा मोठा पडदा, सईच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं आहे. तिच्या या नव्या फोटोवर देखील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा पाऊस पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

‘हॉ’ट’, ‘माय स्टार’, ‘सईशाईन’, ‘क्यूट’, ‘गॉर्जस’, ‘स्टनिंग’ अशा कमेंट्सनी तिचा कमेंट सेक्शन भरून गेला आहे. मूळची सांगलीची असलेली सई आज अनेक जणांची आवडती बनलेली आहे. मंडळी, तुम्हाला सई ताम्हणकरचा हा हॉ’ट लूक कसा वाटला? तुम्हाला तिचा कोणता चित्रपट आवडतो? छोट्या पडद्यावरील तुम्हाला तिची कोणती भूमिका जास्त आवडली आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like