एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हा प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा! गणेश चतुर्थी दिवशी जन्माला आले कन्यारत्न..

मनोरंजन सृष्टीसाठी गेले काही दिवस फारच अड’चणीचे गेले होते. लॉ’कडा’ऊन मुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र सध्या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्याने अनेकांच्या जीवात जीव आला आहे.

कलेची देवता गणेशाचा उत्सव देखील सुरू झाला आहे. त्यामुळे पुन्हा मनोरंजन सृष्टीला सोन्याचे दिवस पाहायला मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच अजून एका कलाकाराच्या बाबतीत एक सुवार्ता समजली आहे.

अभिनेता शाहिर शेख बाबा झाल्याची बातमी सध्या कानावर येते आहे. शाहिर ने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरी एका वेब पोर्टल च्या म्हणण्यानुसार, १० सप्टेंबर रोजी शाहिर शेख बाबा झाला असून त्याची पत्नी रुचिकाने एका कन्यारत्नाला जन्म दिला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchikaa Kapoor Sheikh (@ruchikaakapoor)

१० सप्टेंबरच्या रात्री रुचिकाने मुलीला जन्म दिल्याची बातमी समजते आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना ही बातमी समजताच त्यांनी शाहिर आणि रुचिका वर अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघांनी को’र्ट मॅरेज केले होते. त्यानंतर ते शाहिरच्या आई-वडिलांना भेटायला जम्मूला गेले होते. परत आल्यावर मुंबईमध्ये त्यांनी जंगी रिसेप्शन पार्टी देखील दिली होती.

जून २०२१ मध्ये पहिल्यांदा रुचिका प्रेग्नन्ट असल्याची बातमी समजली होती. अर्थातच रुचिकाने किंवा शाहिरने याबाबत कोणतेच अधिकृत वक्तव्य त्यावेळी देखील केले नव्हते. पण रुचिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून जी स्टोरी शेअर केली होती, त्यावरून चाहत्यांना ही बातमी समजली होती. कारण तिने त्या स्टोरी मध्ये ज्या ब्रँडचा ड्रेस घातला होता, तो ब्रँड केवळ मॅटर्निटी कपड्यांसाठीच प्रसिद्ध आहे.

गेल्या महिन्यातच रुचिकाने आपल्या डोहाळजेवणाचे फोटोही शेअर केले होते. त्यावरून दोघांत तिसरा येणार असल्याची बातमी पक्की झाली. आता रुचिका आणि शाहिरचे कुटुंब वाढले असून बाळाच्या येण्याने हे कुटुंब पूर्ण झाले आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

शाहिर सध्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. लवकरच तो ‘पवित्र रिश्ता २.०’ मधून डिजिटल प्लॅटफॉर्म वर पदार्पण करणार आहे. शाहिरची पत्नी रुचिका कपूर ‘बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड’ ची सिनियर व्हाईस प्रेसिडेन्ट आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. शाहिर आणि रुचिकाला त्यांच्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा!

You might also like