एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी शाहरूख खानसोबत काम करण्यास दिला आहे नकार, ही अभिनेत्री म्हणते ओव्हर ऍक्टिन दुकान..

सर्कस या टिव्हीवरील मालिकेतून अत्यंत कष्टाने पदार्पण करून थोड्याच काळात सबंध विश्वात नाव करणारा बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच शाहरूख खान. शाहरूख खान हा देखिल आपल्या स्वप्नांचं गाठोडं घेऊन कधीकाळी मुंबईत आला होता. त्यानंतर मात्र त्याने त्याच्या अभिनयाने सर्व दुनियेला दिवाना करून सोडले. आजघडीला जगभरात शाहरूख खानचे करोडो फॅन्स आहेत.

कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटांच्या सिन्सची आजही तितकीच क्रेझ आहे. सगळे कलाकार हे शाहरुखबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात. ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षित पासून अनुष्का शर्मा, अलिया भट या सर्व अभिनेत्रींनी शाहरूख खान बरोबर काम केले आहे. शाहरूखसोबत काम करण्यास नकार देण्याचा विचार कुणी स्वप्नातसुद्धा करू शकत नाही. पण या अभिनेत्रींनी मात्र हे धाडस केले.

१) हेमा मालिनी:
हेमा मालिनी यांनी एकेकाळी दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना शाहरुख खान याला त्यांच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली होती. मा चित्रपटाचे नाव दिल आशना असे होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी शाहरुख खान बरोबर कधीही काम केले नाही. त्यांच्या मतानुसार शाहरुख हा ओव्हर अॅक्टींग करतो.

२) सोनम कपूर:
अभिनेता अनिल कपूर याची मुलगी सोनम कपूर हीने अनेक चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रेम रतन धन पायो या चित्रपटातही तिने अभिनेता सलमान खान बरोबर काम केले होते.
या चित्रपटात सलमान खान चे वय तिच्यापेक्षा खूप जास्त होते. पण शाहरूखबरोबर तिने कधीही काम केले नाही. तिच्या म्हणण्यानुसार शाहरुख खान हा वयाने तिच्यापेक्षा खूप मोठा आहे.

३)कंगना रनौत:
कंगना रनौत ही एक अशी अभिनेत्री आहे जिने तिची ओळख स्वतःहून निर्माण केली आहे. तिच्या बऱ्याच चित्रपटात तिची भूमिका हिरोपेक्षा महत्वाची असते. अनेकदा तिने अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आहे. कंगनाने मात्र कुठल्याही खान बरोबर काम केलेले नाही. पण तिने शाहरुख खान याच्या कामाची प्रशंसा केली आहे. तिला त्याचे काम आवर्जून आवडते. कंगना ही नेहमीच तिच्या ठाम भूमिकांमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असते.

४)अमीषा पटेल:
अमीषा हिने कहो ना प्यार है मधून पदार्पण केले होते. २००० साली आलेला हा चित्रपट भयंकर लोकप्रिय ठरला. त्यानंतर गदर या चित्रपटातही तिने दमदार भूमिका साकारली. पण शाहरुख खान सोबत तिचा एकही चित्रपट आलेला नाही. तिचे असे म्हणणे आहे की शाहरुखबरोबर तिची केमिस्ट्री तितकी जमत नाही.

You might also like