एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

क्रिकेट सोडल्यानंतरही सचिन तेंडुलकरची कमाई आहे इतकी! राहतो आलिशान घरात…

सचिन तेंडुलकर हे नाव माहीत नाही, असा क्रिकेटप्रेमीच या जगात नाही. भारतीयांसाठी तर सचिन म्हणजे ‘क्रिकेटचा देव’ आहे. त्याने क्रिकेट विश्वात नोंदवलेले विक्रम अतुलनीय आहेत. त्याचे काही विक्रम तर असे आहेत जे आजपर्यंत कोणीच मोडू शकलेलं नाही. नव्या क्रिकेटर्ससाठी सचिन एक आदर्श आहे. सचिन तेंडुलकरचे यश पाहून अनेकांनी आपल्या मुलांची नावे ‘सचिन’ ठेवली आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

२४ एप्रिल १९७३ रोजी सचिनचा जन्म झाला. १९८४ मध्ये रमाकांत आचरेकर यांनी सचिनची प्रतिभा पाहून त्याला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. २०१३ मध्ये सचिनने क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली. त्याच्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना फार दुःख झाले. क्रिकेट जगतात या गोष्टीमुळे खळबळ माजली होती.

एका लहान घरातून आलेला हा मुलगा आपल्या खेळामुळे मोठा झाला. त्याने करोडोंची संपत्ती कमावली. वयाच्या २२ व्या वर्षीच सचिन जवळपास ३०० कोटी इतक्या संपत्तीचा मालक होता. त्याची बरीचशी कमाई क्रिकेटमधून झाली असली तरी त्याच्या निवृत्तीनंतर जाहिरात हे त्याच्या कमाईचे साधन बनले आहे. १९९५ मध्ये त्याने वर्ल्डटेल बरोबर ३१.५ कोटी रुपयांचा ५ वर्षांचा करार केला. असा करार करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

२००१ मध्ये त्याने एमआरएफ बरोबर १०० कोटी रुपयांचे डील केले. त्याच्याकडे अजूनही अनेक ब्रँड्स च्या जाहिरातींची कामे होती. त्यातून त्याला वर्षाला १७ ते २० कोटी इतकी कमाई होत होती. सध्या त्याची एकूण संपत्ती ८३४ कोटी रुपये इतकी आहे. त्याने अनेक रिअल इस्टेट मध्येही गुंतवणूक करून ठेवली आहे. सचिनची लोकप्रियता इतकी आहे, की क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावरही त्याच्याकडे अनेक जाहिरातींची कामे आहेत.

बांद्रा मध्ये त्याचे एक आलिशान घर आहे. २००७ मध्ये त्याने हा बंगला साधारण ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. त्याचा हा बंगला ६००० स्क्वेअर फूट इतक्या मोठ्या जागेवर वसला आहे. सचिनला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे बीएमडब्लू, फरारी, मर्सिडीज बेंझ सारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे.

एका रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये सचिनने केवळ जाहिरातींमधून ७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. सध्या त्याच्याकडे लुमिनस, ट्रॅव्हलर डॉट कॉम, कोका कोला, आदिदास, अविवा, तोशिबा, स्विस वॉच, कॅस्ट्रॉल, फियाट यांसारख्या ब्रँड्स च्या जाहिराती आहेत.

You might also like