एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हि मराठमोळी अभिनेत्री करतेय CSKच्या ऋतुराज गायकवाडला डे’ट, काय आहे सत्य?

झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ (२०१६) मालिकेने इंडस्ट्रीला दोन नवे चेहरे दिले. शिव ची भूमिका करणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका करणारी सायली संजीव. गोड स्वभावाची गौरी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली. सध्या नेटिझन्स मध्ये तिच्या अफे-यरची चर्चा रंगली आहे. सायली संजीव सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाडला डे-ट करत असल्याचं बोललं जातंय.

सायलीने ‘काहे दिया परदेस’ बरोबरच ‘गुलमोहर’ या मराठी तर ‘परफेक्ट पति’ (२०१८) या हिंदी मालिकेत काम केले आहे. सध्या तिची ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका सुरू आहे. मूळची धुळ्याची असलेली सायली कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंग आणि फॅशन शो करते आहे. ९X झकास च्या ‘लक्स झकास हिरॉईन’ मध्ये देखील तिने भाग घेतला होता. मालिकांसोबतच सायलीने ‘पोलीस लाईन- एक पूर्ण सत्य’ (२०१६), ‘आटपाडी नाइट्स’, ‘मन फकिरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘बस्ता’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

मराठीबरोबरच सायलीने हिंदी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्येही काम केले आहे. बऱ्याच जाहिरातींमध्येही ती आपल्याला दिसली आहे. सायली छान गातेदेखील. याचबरोबर ती भरतनाट्यम व कथ्थक डान्सर आहे. तिला चित्रकला, स्केचेस करणे आणि रांगोळी काढायची आवड आहे. अशी ही हरहुन्नरी कलाकार सध्या ऋतुराज गायकवाडला डे-ट करत असल्याची चर्चा सुरू आहे.

रणजी ट्रॉफी मधून क्रिकेट जगतात पदार्पण केलेल्या ऋतुराज गायकवाडला आपण टी-२० च्या चेन्नई सुपर किंग्ज चा खेळाडू म्हणून ओळखतो. को-रोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली असल्याने ऋतुराजचे चाहते त्याला खेळताना बघण्यासाठी उत्सुक आहेत.त्यातच त्याच्या सायली संजीव बरोबरच्या अफे-यरच्या चर्चेला उधाण आल्याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे.सायली आणि ऋतुराज एकमेकांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर करत असलेल्या कमेंट्स मुळे ही चर्चा सुरू झाली. कमेंट्स बरोबरच हार्ट इमोजी देखील यात असल्याने नेटिझन्स नी या दोघांच्या अफे-यरची चर्चा करण्यास सुरुवात केली. “या मुलीने (सायलीने) केले आहे ऋतुराजला क्लीन बोल्ड” अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्सनी करायला सुरुवात केली. ऋतुराजने मात्र आपल्या इन्स्टा स्टोरी मधून “माझी विकेट फक्त बॉलरच घेऊ शकतात” असे म्हणत ही डे-टिंगची बातमी केवळ अ-फवा असल्याचे स्पष्ट केले.

आता ऋतुराज आणि सायली या दोघांच्या डे-टिंगची बातमी किती खरी, किती खोटी या संभ्रमात नेटिझन्स आहेत. दोघांनाही त्यांच्या आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा हीच आमची आणि प्रेक्षकांची इच्छा!

You might also like