एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटो शेअर करून सांगितली गुड न्युज, मी लवकरच आई होणार आहे..

यावर्षी अनेक सेलिब्रेटींनी आपल्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली आहे. यातील काही कलाकारांनी या छोट्या पाहुण्यांचे स्वागत देखील केले आहे. सध्या या स्वागत यादीत अजूनही काही सेलिब्रेटींची नावे वाढणार असल्याचं दिसतंय.

नुकतीच अभिनेता अंकित मोहन आणि रुची सवर्ण यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनादिवशी या दोघांनी आपण आई-बाबा होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. ‘शुभ दिनी मंगल बातमी’ अशी कॅप्शन टाकत या दोघांनी आपले फोटो शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये रुची आणि अंकितने पिवळ्या रंगाचे एकमेकांना मॅच होणारे कपडे घालत हे फोटो काढले आहेत. अंकितने पिवळा कुर्ता आणि पांढरे धोतर नेसले आहे. रुचीने पिवळी साडी नेसली आहे आणि त्यावर हिरव्या रंगाचे डिझायनर ब्लाऊज घातले आहे. रुची या साडीमध्ये खूपच गोड दिसत आहे. रुची आणि अंकित दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. या दोघांनी २ डिसेंबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchi Savarn (@ruchisavarn)

रुचीने यावेळी अजून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा आणि तिच्या आईचा फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे, की “हा फोटो खूप स्पेशल आहे! डाव्या बाजूला दिसणाऱ्या फोटोत माझी आई आहे जेव्हा ती माझ्या बहिणीच्या वेळी गरोदर होती. अलीकडेच माझे फोटो काढताना माझ्या बाबांनी माझा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढला… आणि आम्ही दोघीही चक्क एकसारख्या दिसतो आहोत!”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchi Savarn (@ruchisavarn)

रुचीने शेअर केलेला फोटो बघितला असता लक्षात येईल, की रुचीच्या आईची पोझ आणि रुचीची पोझ एकसारखीच आहे. त्या दोघी काहीशा एकसारख्याच दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो बघणाऱ्याला आधी हा कोणत्या तरी जुळ्या बहिणींचा फोटो आहे असेच वाटेल. दोघींचेही हे फोटो खूपच गोड दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर इंडस्ट्री मधल्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकितने अनेक हिंदी मालिकांमध्ये तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रुची अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. रुचीने देखील अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. रुची एक प्रशिक्षित आणि उत्तम डान्सर देखील आहे. त्यांच्या घरी येणाऱ्या छोट्या नवीन पाहुण्यासाठी दोघांनाही हार्दिक शुभेच्छा!

You might also like