एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लाखो रुपयांचं नुकसान सहन करत रोहित शर्मा ने विकला लोणावळ्यातला बंगला! या व्यक्तीने खरेदी केली प्रॉपर्टी

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या त्याच्या लोणावळ्यातल्या बंगल्यामुळे चर्चेत आहे. चर्चेचे मुख्य कारण आहे या बंगल्याची विक्री किंमत. जानेवारी २०१६ ला रोहितने आपला लोणावळ्यातला बंगला खरेदी केला होता. बंगला खरेदी करताना त्या बंगल्याची किंमत जवळपास सहा करोड होती. हा बंगला विकताना मात्र खरेदीच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकला गेल्याने याची चर्चा होताना दिसत आहे.

मूळचा नागपूरचा असलेला रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहितचा लोणावळ्यातला हा बंगला ‘डिस्कव्हरी’ नावाच्या प्रोजेक्ट मध्ये आहे. हा डिस्कव्हरी प्रकल्प एस्तू रिऍलिटीने बांधला आहे. जवळपास सात एकरात वसलेल्या या प्रकल्पामध्ये २१ पेक्षाही जास्त बंगले आहेत. यातल्या प्रत्येक बंगल्याला खाजगी गच्ची आहे. या प्रकल्पातला १५ क्रमांकाचा बंगला रोहित शर्माचा होता. हा बंगला जवळपास सहा हजार स्क्वेअर फुटांपेक्षाही जास्त क्षेत्रफळावर वसलेला आहे.

डिस्कव्हरी प्रकल्प हा अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी यांच्यातर्फे उभारण्यात आला आहे. एस्तू रिऍलिटी मधील अनेक भागीदारांपैकी हे दोघेही यामध्ये भागीदार आहेत. २९ मे २०२१ रोजी या बंगल्याच्या विक्रीच्या कागदपत्रांची पूर्तता झाली. १ जून २०२१ रोजी या बंगल्याच्या विक्रीची नोंदणी बंगल्याच्या नव्या मालक सुषमा अशोक सराफ यांच्या नावे करण्यात आली. नव्या मालकाच्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती सध्या उपलब्ध होऊ शकलेली नाहीये.

या बंगल्यासाठी रोहित शर्माने जवळपास सव्वीस लाखाची स्टॅम्प ड्युटी भरल्याचे बोलले जात आहे. हा बंगला विकताना मात्र रोहितला ७५ लाखांचं नुकसान सहन करावं लागलंय. एवढे नुकसान सोसूनही रोहितने हा बंगला का विकला याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. मात्र काही कारणासाठी त्याला तो विकावा लागल्याचे कळते.

रोहित इंडियन प्रीमिअर लीग मधल्या मुंबई संघाचा कर्णधार आहे. एक दिवसीय सामन्यांसाठी तो भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी पार पाडतो. रोहित PETA या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या जागतिक संघटनेचा सदस्य आहे. त्याने मुंबईतील प्रभादेवीमध्ये नुकताच एक आलिशान फ्लॅट घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला, आपल्या आजी-आजोबा आणि काका-काकूंकडे लहानाचा मोठा झालेला रोहित सध्या आपल्या क्रिकेटच्या करिअर मध्ये चांगली कामगिरी करत एक सुखवस्तू आयुष्य जगतो आहे.

रोहितचे २०१५ मध्ये रितिका सजदेह शी लग्न झाले. त्यानंतर ते दोघे आपल्या वरळी येथील आलिशान फ्लॅट मध्ये राहायला गेले. रोहितचा हा फ्लॅट आहुजा अपार्टमेंट्स मध्ये आहे. त्यावेळी त्याने तो ३० कोटी रुपयांना घेतला होता. रोहितचा हा फ्लॅट हजार स्क्वेअर फुटांचा आहे.

सेलिब्रेटींच्या अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो. त्यासाठी आमचे लेख वाचत चला आणि ते कसे वाटले तेदेखील आम्हाला कमेंट्स मधून सांगत चला.

You might also like