एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चा परीक्षक पडलाय प्रेमात! कोण आहे रोहित राऊतची गर्लफ्रेंड? पहा

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चे नवे पर्व वेगवेगळ्या कारणांसाठी गाजत आहे. या पर्वाचे विशेष आकर्षण आहे ते म्हणजे या पर्वाचे परीक्षक. झी मराठी वरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ ह्या पहिल्या पर्वातील पंचरत्ने अर्थात कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन हेच आता या पर्वाचे परीक्षक म्हणून काम बघत आहेत. आज मात्र आम्ही एका वेगळ्याच कारणासाठी हा लेख लिहीत आहोत.

या पंचरत्नांमधला रोहित राऊत त्याच्या वेगवेगळ्या ढंगांमधल्या गाण्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये त्याने आपल्या याच आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. रोहितने अनेक चित्रपटांसाठी देखील पार्श्वगायन केले आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मुळे रोहितला सगळा महाराष्ट्र ओळखू लागला. मात्र रोहित एवढ्यावरच थांबला नाही. ‘इंडियन आयडॉल’ मध्येदेखील तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यामुळे त्याला देशभरात एक नवी ओळख मिळाली.

सध्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ व्यतिरिक्त रोहित चर्चेत आहे तो त्याच्या रिलेशनशिपमुळे. त्याने अगदी उघडपणे या गोष्टीचा कबुलीजबाब दिला नसला तरी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो ज्या व्यक्तीबरोबरचे फोटो नेहमी शेअर करत असतो त्यामुळे त्याच्या या क्यूट रिलेशनशिपची कल्पना येते. तर मंडळी, ती व्यक्ती आहे जुईली जोगळेकर. गेल्या दहा वर्षांपासून हे दोघे एकत्र असून प्रेक्षक या जोडीवर खूष आहेत.

व्हॅलेंटाईन डे दिवशी या दोघांनी आपला एकत्र फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. जुईली जोगळेकर ही देखील एक गायिका असून ती प्रेक्षकांना ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून भेटली होती. तिच्या गोड आवाजाने परीक्षकांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

सोशल मीडिया वरच्या या दोघांच्या फोटोज् वरून आपल्याला कळू शकतं की दोघेही एकमेकांबरोबर खूष असून खूपदा एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. काहीही म्हणा, प्रेक्षकांना ही सूरमयी जोडी प्रचंड आवडून गेलेली आहे.

काय मग मंडळी, तुमहाला कशी वाटली ही गोड गळ्याची गोड जोडी? आवडली ना तुम्हाला देखील ही जोडी? आम्हाला तुमचे मत कळवायला विसरू नका. तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही असे अनेक लेख नेहमीच आमच्या वाचकांसमोर घेऊन येत असतो. तुमची मते आमच्यासाठी मौल्यवान आहेत. वेळोवेळी आम्हाला ती कमेंट्स मधून कळवत चला.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

You might also like