एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही’ रितेशचं ट्विट चर्चेत

बॉलिवूड मध्ये अनेक सुप्रसिद्ध जोड्या आहेत. त्यातलीच एक जोडी म्हणजे जिनिलिया आणि रितेश. ‘तुझे मेरी कसम’ म्हणत दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. दोघांच्या लग्नाने चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. विनोदी अभिनेता म्हणून रितेश देशमुखने बॉलिवूड मध्ये आपले नाव कमावले आहे, तर जिनिलियानेही हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या दोघांनीही ‘तुझे मेरी कसम’ या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. मात्र त्यावेळी जिनिलियाने या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले. नंतर मात्र २०१२ मध्ये रितेश आणि जिनिलियाने आपले नाते विवाहबंधनात अडकवून टाकले. २०१४ मध्ये जिनिलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला म्हणजेच रियान ला जन्म दिला. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा राहिल चा जन्म २०१६ मध्ये झाला.

जिनिलिया आणि रितेश चे एकमेकांच्या आयुष्यातील स्थान खास आहे. नुकताच ५ ऑगस्ट ला जिनिलिया चा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रितेशने केलेले ट्विट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जिनिलियाने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. तिला शुभेच्छा देताना अनेकांनी ‘जेनेलिया’ असे तिचे नाव लिहिले होते. त्यावेळी रितेशने ट्विट करत “माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे… ‘जेनेलिया’ नाही” असे स्पष्ट केले आहे.

त्याच्या या ट्विटची खूप चर्चा होत आहे. दरम्यान रितेशने जिनिलियाचा एक व्हिडिओ शेअर करत “वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको- माझी जगातली सर्वांत स्पेशल व्यक्ती” असे कॅप्शन दिले आहे. काहींनी या ट्विटवर जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी रितेशला उखाणा घ्यायला सांगितलं आहे. दुसऱ्या एका युजरने ‘हा खरा संघर्ष आहे’ असा रिप्लाय दिला आहे.

जिनिलिया आणि रितेशची जोडी बॉलिवूड मध्ये आणि चाहत्यांमध्येही फार प्रसिद्ध आहे. दोघे नेहमी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. दोघांनी एकमेकांबरोबर बरेच चित्रपटही केले आहेत. मस्ती (२००४), तेरे नाल लव्ह हो गया (२०१२) यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अशाच काही मनोरंजन सृष्टीतल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला. तुम्हाला आवडलेले लेख जरूर लाईक करा. तुमचे आवडते लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like