एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली बाप्पाची आरती! रितेश आणि जेनेलियाचे कौतुक..पहा विडिओ

गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सगळ्यांनी अगदी धूमधडाक्यात नसला, तरी खूप मनोभावे गणपतीला आपल्या घरी आणले आहे. सेलिब्रेटींपासून सामान्य माणसापर्यंत सगळेच बाप्पाचे भक्त आहेत. बाप्पाच्या येण्याने सगळ्यांच्याच घरी उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात सर्वांत जास्त उत्साह असतो, तो मोठयाने आरत्या म्हणायचा. अर्थात त्यानंतर मिळणारा प्रसाद हे त्याचे मूळ ध्येय असले, तरी धूमधडाक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या हा सगळीकडेच दिसणारा नजारा आहे.

घरात मोठ्यांनी मोठ्याने आरत्या म्हटल्या, की चिल्लर पार्टी लगेचच त्यांचे अनुकरण करते. अर्थात त्यामुळे त्यांना वेगळ्या आरत्या म्हणायला शिकवायला लागत नाहीत. अशा सणांमध्येच लहान मुलांवर हे संस्कार घडत असतात. अशाच दोन संस्कारी लहान मुलांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या दोन मुलांनी म्हटलेली बाप्पाची आरती लोकांच्या कौतुकाचा विषय झाली आहे.

तर ही दोन मुलं आहेत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची. रियान आणि राहिल अशी रितेशच्या दोन मुलांची नावे आहेत. रितेशने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये रियान आणि राहिल या दोघांनी मिळून गणपतीची आरती न चुकता तालासुरात म्हटली आहे. लहान वयात मुलांना आरती पाठ असल्याने या मुलांचे खूप कौतुक होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. अनेक लोकांनी त्याच्या या पोस्ट वर कमेंट करत मुलांचे कौतुक केले आहे. तसेच रितेश आणि जेनेलियाचेही कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले आहेत, अशा कमेंट्स करत लोकांनी त्या दोघांचे कौतुक केले आहे. चाहत्यांनी रितेशच्या या पोस्ट वर हार्ट इमोजी टाकत मुलांसाठी प्रेम दर्शवले आहे. अभिषेक बच्चन सारख्या काही सेलिब्रेटींनी देखील त्याच्या या पोस्ट वर कमेंट्स केल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रियान आणि राहिल यांनी या व्हिडिओ मध्ये पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. त्यावर सुंदर असे गुलाबी रंगाचे जॅकेट देखील आहे. दोघांनी एकसारखाच ड्रेस घातला आहे. या ड्रेस मध्ये दोघेही खूप सालस आणि निरागस दिसत आहेत. दोघांनीही खूप उत्साहात गणपती बाप्पाची आरती म्हटली आहे. दोघे मांडी घालून शेजारी शेजारी बसले आहेत. हात जोडून दोघांनीही आरती म्हटली आहे.

You might also like