एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रिंकू राजगुरूच्या फोटोवर शाहीद कपूरच्या भावाची कमेंट, नेटकरी म्हणाले ही तर..

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या बाबतीत सतत काही ना काही किस्से घडलेले ऐकायला मिळत असतात. आणि सामान्य लोकांना अशा बातम्या फारच रूचकर वाटत राहतात. त्यात गंमत म्हणजे, या सगळ्यात आपल्या आवडीच्या कलाकाराची बातमी असेल तर मग ते जाणून घेण्यात फारच रस दाखवतात. “सैराट” फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आपल्यापैकी अनेकांनाच माहित आहे. तिच्या बाबतीत नेमकं काय घडलं आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

बाॅलिवुड मधल्या एका फेमस कराकाराने रिंकुच्या इन्स्टा पोस्टवर कमेंट केलीय. आता मध्यंतरी रिंकूने असं जाहीररित्या सागितलं हःतं की तिला विकी कौशलसोबत डेट करायला आवडेल. आता या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करणारा कलाकार विकी आहे कि आणखी कोण? ते आपण जाणून घेणारच आहोत. इकडे रिंकु सोशल मिडियावर ॲक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे सुंदर फोटो ती अपलोड करत राहते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तसेच चाहत्यांच्या कमेंट ला लाईक आणि रिप्लाय करून ती आपला फॅन फाॅलोविंगसुद्धा वाढवत असते.

नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूचं हे पहिलं फोटोशूट होतं. ज्यात रिंकू ने टाकलेले भारी भारी फोटो खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना भुरळ घालत आहेत. तर तिने इन्स्टाग्राम वर शेयर केलेल्या या फोटोत रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. डेनिम, टी शर्ट आणि त्यावर चौकटीचं जॅकेट शिवाय जॅकेटला मॅचिंग अशी बॅग हा रिंकूचा लूक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या फोटोत रिंकूचा आत्मविश्वास झळकतोय. त्याचसोबत तिच्या वेगवेगळ्या पोजेस सुद्धा आहे.

या पोस्टमध्ये लक्षवेधक घडलेली गोष्ट अशी की यामध्ये बाॅलिवुडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर याच्या भावाने म्हणजे इशान खट्टरने कमेंट केली आहे. ईशान खट्टर हा एक तरुण अभिनेता आहे. जो सध्या खूप चांगलं काम करत आहे.
तर या प्रसिद्ध तरुण अभिनेत्या ने रिंकू राजगुरू च्या फोटोवर ‘वाइब’ अशी कमेंट केलीय. आणि या कॉमेंट नंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे यांचे दोघांचे काही चालू आहे का ? तर रिंकूने देखील काही स्माईली देत इशानला रिल्पाय दिला आहे.

या सगळ्यातून दोघांचेही चाहते झालेल्या प्रकार नेमकं काय सांगू पाहतोय हे जाणून घ्यायचं आहे. रिंकू राजगुरुच्या फोटोवर इशान खट्टरी कमेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इशान हा ही एक चांगला अभिनेता आहे. विशेष गोष्ट अशी की दोघांनीही एकाच सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आहे. रिंकू ने “सैराट” केला तर याचाच हिंदी रिमेक बनलेला “धडक” इशानने केला होता. धडकमध्ये इशानने सुंदर अभिनय केला होता.

दोघांची इंडस्ट्रीत एन्ट्री याच सिनेमातून झालेली आहे. म्हणजे ‘सैराट’ या सिनेमातून रिंकू राजगुरुने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तर इशान खट्टरने ‘सैराट’ चा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. रिंकू आणि इशानच्या कमेंट रिप्लाय काय दर्शवतायत हे काही काळात कळेलच.

You might also like