एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर रिंकू ने मौन सोडलं! रिलेशनशिपचा केला खु’लासा…

‘सैराट’ मधील आर्चीच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळालेली रिंकू राजगुरू प्रेक्षकांची अत्यंत लाडकी बनली आहे. आपल्या बिनधास्त अंदाजानं आर्चीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. परश्याला बेधडक ‘आय लव्ह यू’ बोलणारी आर्ची प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेली.

तिच्या चाहत्यांची संख्या हजारोंनी वाढली. तिचा हा डायलॉग घराघरांत बोलला जाऊ लागला. या प्रसंगाने प्रेक्षकांची मात्र उत्सुकता एका गोष्टीसाठी चाळवली गेली. ती म्हणजे रिंकूच्या खऱ्या आयुष्यातला परश्या कोण आहे ही.

प्रेक्षकांना सिनेतारकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यांच्या रिलेशनशिप बद्दल नेहमीच चर्चा होत राहते. रिंकू राजगुरू सोशल मीडिया वर सक्रिय असलेली अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सतत ती लाइव्ह किंवा वेगवेगळ्या सेशन मधून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच तिने इंस्टाग्राम वर #AskMeAnything हे सेशन घेतलं होतं. त्यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

या सेशन मध्ये चाहत्यांनी रिंकूला तिचा आवडता पदार्थ, आवडते ठिकाण यांसारखे प्रश्न विचारले. तसेच काही चाहत्यांनी तिला तिच्या आगामी चित्रपटांबद्दल देखील विचारलं. एका चाहत्याने तिला ‘तुझा बॉ’य’फ्रें’ड आहे का?’ असा प्रश्न विचारला. सहसा अभिनेत्री अशा प्रश्नांची उत्तरं टाळतात. रिंकूनं मात्र चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं.

आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं ‘No’, म्हणजेच ‘नाही’. आपल्याला बॉयफ्रेंड नसल्याचं रिंकूनं सांगितलं. आर्ची ला तिच्या खऱ्या आयुष्यातला परश्या अजून भेटला नसल्याचे सध्या चित्र आहे.

रिंकूची ही पोस्ट सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. काही चाहत्यांना अपेक्षित असलेलं उत्तर न मिळाल्याने ते काहीसे मनातून हिरमुसले असावेत. काही तथाकथित परश्यांच्या मनात मात्र या उत्तराने गुलाबाची फुले उमलली असतील.

रिंकू लवकरच ‘छूमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मध्ये झालं असून रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना देखील या चित्रपटात असतील. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातही रिंकूने काम केले आहे.

या चित्रपटात ‘सैराट’ मधील परश्या अर्थात आकाश ठोसर आणि अमिताभ बच्चन देखील आहेत. खुशबू सिन्हा दिग्दर्शित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटातही आपल्याला रिंकूच्या अभिनयाची झलक पाहायला मिळेल.

रिंकूच्या या इंस्टाग्राम सेशन नंतर प्रेक्षक रिंकूला तिच्या मनासारखा परश्या मिळू दे अशीच प्रार्थना करत असतील. रिंकूला आमच्या टीम कडून पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

You might also like