एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सैराट मधील आर्चीचा नवीन बोल्ड लुक आला समोर, निसर्गाच्या सानिध्यात घेतेय असा आस्वाद..

निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. पण आपण मात्र सर्रास या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सध्याच्या या कोरोना काळात निसर्गाच्या शुद्ध आणि स्वच्छ हवेची किंमत आता माणसाला कळून चुकली आहे. आता अनेक जण निसर्गाच्या कुशीत परत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपले सिनेसेलिब्रेटी देखील मागे नाहीत बरं का! नुकताच ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

‘सैराट’ (२०१६) चित्रपटाने जसा चित्रपटसृष्टीला परश्या दिला तशी आर्ची देखील दिली. रिंकू राजगुरूने साकारलेली ही भूमिका प्रचंड गाजली. तिला त्यासाठी पदार्पणातले अनेक पुरस्कारही मिळाले. ‘सैराट’ च्या कन्नड रिमेक मध्येही रिंकूने मुख्य नायिकेचे काम केले आहे. त्यानंतर तिने कागर, मेकअप, अनपॉज्ड आणि झुंड या चित्रपटांमध्ये देखील कामे केली. २०२० मध्ये हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या ‘हंड्रेड’ या मालिकेमध्ये रिंकूने अभिनेत्री लारा दत्ता बरोबर काम केले. ‘हंड्रेड’ ही मालिका एक ऍक्शन कॉमेडी मालिका आहे.

रिंकू सोशल मीडिया वर प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिच्या आर्ची च्या भूमिकेमुळे ती बरीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट द्वारे ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी आपले विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या फोटोज् आणि व्हिडिओज् वर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. आतादेखील तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओ ला प्रचंड लाईक्स आले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

या व्हिडिओ मध्ये रिंकू चालत चालत निसर्गाचा आस्वाद घेताना दिसत आहे. या व्हिडिओ ला तिने एक सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे – “नेचर हील्स एव्हरीथिंग”. ‘निसर्ग सर्व काही ठीक करतो’ अशा आशयाचं ते कॅप्शन आहे. या व्हिडिओ मध्ये ती मास्क घालून निसर्गभ्रमणाचा आनंद घेताना दिसत आहे. आपल्या कॅप्शन मध्ये देखील तिने लोकांना मास्क घालण्याविषयी आवाहन केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

तर मग मंडळी, तुमची लाडकी रिंकू सांगते म्हणून तरी आता बाहेर जाताना मास्क घालून जाणार ना? दोस्तहो, केवळ रिंकू राजगुरू सांगते म्हणून नाही, तर तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी म्हणून बाहेर जाताना मास्क लावून जात जा. स्वतःची काळजी घ्या आणि आमचे लेख कसे वाटले हे सांगायला विसरू नका.

You might also like