एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लाल इश्क’ रिंकूचा घरंदाज बाज! नव्या फोटोशूटने पाडली चाहत्यांना भुरळ…

एखाद्या मोहक स्त्रीची भुरळ सगळ्यांनाच पडते. तिची शालीनता आणि कुलीनता तिच्या व्यक्तिमत्वात भर टाकतात. अशा स्त्रियांकडे पाहिले की त्यांच्या घरंदाज असण्याचा अंदाज येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अशा सौंदर्याने मोहित होऊन जातात. पण हे सगळं सांगण्याचा हा खटाटोप का? याचं कारण आहे अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी आर्चीचं नवीन फोटोशूट.

‘सैराट’ च्या प्रदर्शनानंतर रिंकू राजगुरू या नावाचा डंका सगळीकडे वाजू लागला. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी रिंकू अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता जरी पाच वर्षं झाली असली तरी चाहते आजही तिला ‘आर्ची’ या नावानेच बोलवणे पसंत करतात. अशी ही आर्ची सोशल मीडिया वरून नेहमी आपल्या लाडक्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ भन्नाट वेगाने व्हायरल होतात.

सध्या असंच व्हायरल होतंय ते रिंकूचं नवीन फोटोशूट. रिंकूने आपल्या या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आणि या फोटोंनी तिच्या चाहत्यांना पुन्हा याड लावलं. ‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क, ये ऐब इश्क, ये बैर इश्क’ अशी सुंदर आणि साजेशी कॅप्शन तिने या फोटोंना टाकली आहे. लाल साडीमधले तिचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. त्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

तिने नेसलेल्या लाल चुटुक रंगाच्या साडीला सोनेरी नक्षीदार काठ आहेत. तशीच सोनेरी नक्षी तिच्या साडीभर पसरली आहे. लाल रंगाचे मॅचिंग ब्लाऊज या साडीच्या सौंदर्यात अजून भर घालत आहे. कमी पण ठशीव असे दागिने रिंकूच्या या घरंदाज लूक ला चार चाँद लावत आहेत. हातात नक्षीदार सोनेरी ब्रेसलेट्स, गळ्यात हिरवे मणी असलेला उठावदार सोनेरी नेकलेस, कानात बारीक मोत्यांची किनार असलेले ठसठशीत झुमके आणि कपाळावर अत्यंत साधी पण त्यामुळेच उठून दिसणारी गोल हिरवी टिकली असे साज ल्यालेली रिंकू खूपच मोहक दिसत आहे.

या लाल, हिरवा आणि सोनेरी रंगांच्या अगदी विरुद्ध दिसणारा रंग म्हणजे पांढरा. पण तिने केसात माळलेल्या पांढऱ्या गजऱ्याने तिचे शालीन रूप अजूनच उठून दिसते आहे. या सर्वांवर कडी करणारा दागिना म्हणजे रिंकूचे काजळ घातलेले मोठे, बोलके आणि समोरच्याच्या डोळ्यांत थेट पाहणारे डोळे. तिच्या या शालीन अदांकडे पाहणारा पाहातच राहील. काय मग मंडळी, तुम्हीही घायाळ झालात का रिंकूचे हे फोटो बघून? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका.

You might also like