एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रिंकू राजगुरूच्या झिंगाट लूकवर चाहते फिदा.. बघा काय म्हणतेय रिंकू..

सैराट या चित्रपटातून सर्वदूर ख्याती मिळवलेली प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू ही तिच्या नव्या हेअरस्टाईल आणि लूकमुळे परत एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच रिंकू राजगुरू हीने तिच्या इन्स्टाग्राम वरील अकाउंटवरून टू पिस परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत.

यावर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला आहे. अजूनही तिचे चाहते व्यक्त होत आहेत. सुंदर, हॉट, छान, एकदम झिंगाट अशा अनेक प्रतिक्रिया तिचे चाहते नोंदवत आहेत. रिंकूचा हा लूक तुम्ही खालील फोटोंमधे पाहू शकता.

रिंकूने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत टू पिस परिधान केला आहे. यात ती खूप स्लिम ट्रिम आणि सुंदर दिसत आहे. ती या फोटोत तिचा नवीन लूक मिरवताना दिसत आहे. तिला स्वतःलाही हा लूक खूप आवडलेला तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.

फोटोसोबत तिने लिहिले आहे की.. “स्माईल ही फ्री थेरपी आहे. आनंदी आणि स्वस्थ राहा.” हा इतका उत्तम संदेश दिल्यामुळे चाहते अजूनच खूश झाले आहेत. रिंकूने तिच्या स्टोरीवरही काही फोटो शेअर केले.

या फोटोंमधे ती तिच्या घोडीसोबत दिसून आली आहे. या घोडीचे नाव राणी असे आहे. रिंकूचा हा घोडीबरोबरचा फोटोही खास चर्चेत आला आहे. इतकेच नाही तर कुत्री, मांजरी या प्राण्यांसोबतही रिंकू सतत फोटो काढत असते आणि पोस्ट करत असते. यावरून तिला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम असल्याचे कळून येते.

सैराटनंतर रिंकूचे करिअर अगदी सुसाट सुटले. तिचे लागोपाठ कागर आणि मेकप हे दोन सिनेमे रिलिज झाले. या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. यात रिंकूचा अभिनयही खुलून आलेला दिसला.

मध्यंतर रिंकूचे खूप वजन वाढत होते. त्यामुळे तिच्या भूमिका करण्यावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे तिने नियमित व्यायाम, योग्य आहार आणि काळजी घेऊन तिचे वजन घटवले. तिने यासाठी फिटनेस क्षेत्रातल्या तज्ञांचाही सल्ला घेतला. तिने घेतलेल्या या मेहनतीमुळे तिचे वजन बरेच आवाक्यात आले आणि हा बदल पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असल्यास परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नाही. रिंकू राजगुरूचा हा नवीन लूक कदाचित तिच्या आगामी चित्रपटातलाही असू शकतो. रिंकू सध्या तिच्या फोटोज आणि अदांमुळे प्रसिद्ध होत आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल ४ लाख ६३ हजार लोक फॉलो करतात.

फॉलोअर्स असणं हे आजच्या काळातलं यशाचं मापदंड आहे आणि त्यात रिंकू अव्वल ठरत आहे. ती सतत स्टोरीज आणि पोस्ट्समधून चाहत्यांना तिचे अपडेट देत राहते.

रिंकू राजगुरूला तिच्या आगामी चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा. रिंकू राजगुरूसारख्या अनेक स्टार्सचे अपडेट ऐकण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. लाईक करा. हा लेख जास्तीत जास्त शेअर केला.

You might also like