एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपं नाही…’ रिंकू पुन्हा प्रेमात!

अभिनेत्री रिंकू राजगुरू ला आपण ‘सैराट’ चित्रपटात आर्चीच्या भूमिकेत पाहिले आहे. प्रेमात पडलेली आर्ची प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. या प्रेमात पडलेल्या आर्चीने प्रेक्षकांनाही आपल्या प्रेमात पाडले. तिचा हा प्रेमळ अंदाज परत कधी बघायला मिळणार, याची प्रेक्षक वाट बघत होते. तर दोस्तहो, दिल थाम के बैठीए! आता पुन्हा एकदा रिंकू प्रेमात पडण्यासाठी आणि आपल्या अभिनयाने तुम्हाला प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.

आपल्या नैसर्गिक अभिनयाने रिंकूने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर सध्या रिंकूची चलती आहे. ‘हंड्रेड’ या वेब सिरीजच्या यशानंतर रिंकू बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त झाली आहे. तिचे काही चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शनाच्या मार्गावर असताना तिच्या अजून एका वेब सिरीजची घोषणा झाली आहे. त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाची लाट पसरली आहे.

लवकरच रिंकूचा ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, बरुण सोबती यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट २० ऑगस्ट ला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोचलेली असतानाच रिंकूच्या अजून एका वेब सिरीजची घोषणा करण्यात आली आहे.

‘अनकही कहानिया’ असे या वेब सिरीजचे नाव असणार आहे. हा नेटफ्लिक्स चा नवा प्रोजेक्ट आहे. रिंकूबरोबर या प्रोजेक्ट मध्ये कुणाल कपूर, झोया हुसेन सारखे कलाकारही काम करणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

या वेब सिरीज मध्ये तीन वेगवेगळ्या कथांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. रिंकू पुन्हा या वेब सिरीज मध्ये एका प्रेमकथेत दिसणार आहे. रिंकूची ही नवी वेब सिरीज पुढच्या महिन्यात १७ सप्टेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रिंकू राजगुरू चे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट लॉकडाऊन मुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. पण हा चित्रपट अजूनही प्रदर्शित झाला नसल्याने रिंकूच्या चाहत्यांमध्ये थोडी निराशा पसरली होती. मात्र आता तिच्या या नव्या चित्रपट आणि वेब सिरीज च्या घोषणेने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

You might also like