एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आगामी चित्रपटांत या अभिनेत्याची मुलगी करणार बाॅलिवुड मध्ये एंट्री, सौंदर्यामध्ये आहे आताच्या स्टार अभिनेत्रींच्या तोडीस तोड!

अलीकडे बऱ्याच बाॅलीवूड कलाकारांची मुले अर्थात स्टारकिड्स वेगवेगळ्या चित्रपटांतुन बाॅलिवुड मध्ये एंट्री करत आहेत. यामध्ये आपण नाव घ्यायला गेलो तर सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान या आणि अशा अनेक जणांची नावे आपल्याला आठवतातत. ही चर्चेतली स्टारकिड्स असली तरी अनेक स्टारकिड्स असे आहेत ज्यांना चर्चेत राहणं आवडत नाही.

चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्स पैकी जान्हवी कपूर चा “धडक”, सारा अली खानचा “सिम्बा” आणि केदारनाथ हे चित्रपट चांगलेच हीट ठरले.

आता या स्टारकिड्स मध्ये आणखी एका कलाकाराच्या मुलीची बाॅलिवुड इंडस्ट्रीमध्ये नव्याने एंट्री होणार आहे. मात्र हा कलाकार बाॅलिवुडचा नसुन भोजपुरी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलाकार आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीशिवाय बाॅलिवुड मध्ये हा कलाकार तितकाच सक्रिय आहे. भोजपुरी चित्रपट म्हटलं की अगदी कुणाच्याही तोंडून याच कलाकाराचे नाव निघेल. बाॅलिवुड इंडस्ट्रीमध्येही याचे खूप फॅन फाॅलोव्हिंग आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसुन रवि किशन हा आहे. आजवर अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये आपण याला पाहत आलो आहे. पण आता त्याच्या मुलीला चित्रपटांत काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सौंदर्याने सारा, जान्हवी, अनन्या यांच्या तोडीस तोड असणारी रवि किशन याची मुलगी रीवा शुक्ला ही सध्या बाॅलिवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार आगामी काळात येणाऱ्या बाॅलीवूडच्या “सबकुशल मंगल है” या चित्रपटातून ती डेब्यु करणार असल्याचे समजत आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे एकेकाळची स्टार अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हिचा मुलगा प्रियंक शर्माही या चित्रपटातुन रिवा सोबत आपल्याला दिसणार आहे. ‘रीवा माझी ॲक्टिंग बघत मोठी झालीय. शिवाय तिच्यात जन्मजातच कलाकारी असल्यामुळे तिचे या क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल असणार आहे.’ असे मत रवि किशन यांनी आपल्या मुलीबद्दल व्यक्त केले.

रीवा शुक्ला ला तिच् इ बाॅलिवुड च्या पदार्पणाविषयी विचारले असता ती म्हणाली, “मी अमेरिकेत होते तेव्हा माझ्या पप्पांचे एक मित्र मोईन बेग यांनी मला ही आनंदाची बातमी फोनवरून दिली.” पहिलाच चित्रपट असणाऱ्या रीवासोबत प्रियंक शर्माही बाॅलिवुड मध्ये डेब्यु करत असल्याचे समजत आहे.

या दोघांच्याही पहिल्या चित्रपटाचे नाव “सब कुशल मंगल है” असेल अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे. करण कश्यप, जो शाद अली, मणिरत्नम आणि शिमित अमीन यांचे सहाय्यक होते, या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. करण कश्यपचा हा पहिला चित्रपट आहे. या आगामी चित्रपटाचे शुटींग येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निर्माता नितीन मनमोहन यांची मुलगी प्राची या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

You might also like