एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुंबईत क्रूझ वरील रे’व्ह पार्टी उधळली! शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरू..

अंम’ली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) एका क्रूझ वरील रेव्ह पार्टीवर धाड टाकत १० जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई लगतच्या समुद्रात एका मोठ्या क्रूझ वर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. एनसीबीने क्रूझ वर धाड टाकत अं’मली पदार्थ आणि १० हून अधिक बड्या व्यक्तींना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एनसीबीने ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींमध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे.

ताब्यात घेतलेले लोक आणि कार’वाई..
समोर आलेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलिशान क्रूझ वर ही रे’व्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यामध्येच आर्यन खानचाही समावेश होता. याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्याचा या ड्रॅ’ग पार्टीशी काय संबंध होता, त्याला कुणी बोलावलं होतं याची सध्या चौकशी सुरू आहे. अद्याप त्याच्यावर कोणताही गु’न्हा दाखल झालेला नाही, तसेच त्याला अ’ट’क देखील करण्यात आलेली नाही.

या पार्टीत दिल्लीहून मुंबईला आलेल्या तीन तरुणींचाही समावेश आहे. या तरुणींनाही एनसीबीने ताब्यात घेतले असून या तिघी दिल्लीच्या मोठ्या उद्योजकांच्या मुली असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी या प्रकरणाची केवळ चौकशी सुरू असल्याचे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले. दरम्यान, ड्र’ग्ज पार्टीच्या ६ आयोजकांना समन्स धाडण्यात आला आहे.

आर्यन खानची चौकशी…
आर्यन खानचा मोबाईल ज’प्त करण्यात आला असून त्याच्या व्हॉ’टस्ऍ’प्प चॅट आणि मेसेजेसची तपासणी सुरू आहे. दरम्यान, आर्यन खानच्या चौकशीत काही गोष्टी उघड झाल्या आहेत. आर्यन खानला व्हीआयपी गेस्ट म्हणून या पार्टीला बोलावण्यात आल्याचे आर्यनने या चौकशी दरम्यान सांगितले. त्याच्याकडून या क्रूझवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नव्हती, असेही तो म्हणाला. शिवाय, त्याच्या नावाचा वापर करून इतर लोकांना या पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं, असंही त्यानं या चौकशी दरम्यान सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

ड्र’ग्ज आणि पार्टी शुल्क..
या पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी ८० हजार इतके शुल्क आकारण्यात आले होते. दरम्यान, क्रूझवर ड्र’ग्ज आले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी क्रूझवर येताना आपल्या पँट, अंडरवेअर, कॉलरच्या शिलाईमध्ये, तर महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये ड्र’ग्ज लपवून आणल्याची माहिती एका संबंधित अधिकाऱ्याने दिली.

You might also like