एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दिपा खऱ्या जीवनामध्ये दिसते खूपच सुंदर, पहा फोटो..

स्टार प्रवाह या वाहिनीवरून प्रदर्शित होणारी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला खूप कमी कालावधीत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. बऱ्याच व्यक्तींचा असा समज असतो की, रंग गोरा असणे म्हणजेच सौंदर्य असणे. अनेकांना वाटते आपला रंग गोराच असावा आणि आपल्या बरोबरच आपले नातेवाईक देखील रंगाने गोरेच असावेत. या कारणावरून कित्येकदा अनेक लोक वर्णभेदाला बळी पडतात.

अनेक लोक अशी देखील आहेत की, त्यांना जास्तीत जास्त गोरे व्हायचे असते. मात्र, खरं सांगायचं तर रंग आणि सौंदर्य या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही एक संबंध नाहीये. आपला आत्मविश्वास, आपले शरीर, आपल्या त्वचेची गुणवत्ता आणि आपला आत्मविश्वास या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीला आकर्षक बनवत असतात. एखादी व्यक्ती त्वचेने पांढरी नसली तरी आपल्या तंदुरुस्त आणि सुदृढ शरीरयष्टीने देखील लोकांना आकर्षित करू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमधील दिपा देवकुळे या पात्राचे लग्न झाले असून तिचे नाव आता दिपा इनामदार झाले आहे. दिपाचे खरे नाव रेश्मा शिंदे आहे. तिचा जन्म २७ मार्च १९८७ ला मुंबईमध्ये झाला आहे. तिने शाळा आणि कॉलेजचे शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण केले आहे. रेश्मा ही विवाहित अभिनेत्री आहे. तिच्या पतीचे नाव अभिजित चौगुले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

अभिनेत्री रेश्मा आणि अभिजित यांचे लग्न २९ एप्रिल २०१२ मध्ये झाले होते. अभिजित हा मूळचा कोल्हापूरचा आहे. मात्र, तो सध्या पुण्यामध्ये नोकरी करतो. तो सिव्हिल इंजिनिअर आहे. रेश्माची टीव्हीच्या पडद्यावर सुरुवात ही २०१० मधल्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या मराठी शोपासून झाली. त्याच शोमध्ये ‘बंध रेशमाचे’ या मालिकेच्या निर्मात्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

त्यानंतर तिने ‘बंध रेशमाचे’ या मालिकेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारली. रेश्माने नंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लगोरी मैत्री’ ही मालिका केली आणि ती त्यामुळे एक स्टार झाली. तिच्या करिअरमध्ये तिने झी मराठीवरील ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

तिने मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ‘देवा एक अंतरंगी’ हा रेशमाचा पहिला चित्रपट २०१७ मध्ये आला. ‘रंग हे प्रेमाचे, एक अलबेला, लालबागची राणी’ यासारख्या चित्रपटात रेश्माने अभिनय करून चाहत्यांची मन जिंकली आहेत.

सध्या रेश्मा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एक सोज्वळ मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे. जिला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्तींची काळजी असते आणि ती भूमिका रेश्मा अतिशय चांगल्या पद्धतीने निभावत आहे. अशी ही रेश्माची आजपर्यंतची सिनेसृष्टीतील कारकीर्द आहे आणि पुढेही ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील.

दरम्यान, रेशमाचा रंग या मालिकेत सावळा दाखवला आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यात प्रचंड गोरी आहे. मात्र, या मालिकेत ती तिच्या सौंदर्यानेनाही तर तिच्या प्रेमाने सर्वांची मने जिंकून घेते. आजकालच्या आधुनिक युगात देखील अनेक लोक वर्णभेद करतात. मात्र, वर्णभेद करू नये, व्यक्ती सावळा किंवा गोरा या वरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरवू नये, हे या मालिकेतून शिकण्यासारखे आहे.

You might also like