एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘नाळ’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या बहिणीला ओळखले का? ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री…

नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ चित्रपटाने देविका दफ्तारदार या अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळवून दिली. या चित्रपटात तिने चैत्याच्या आईची भूमिका केली होती. तसं बघायला गेलं तर देविका रंगभूमीची खेळाडू.

रंगभूमीवर जम बसवल्यानंतर तिने चित्रपटांच्या रिंगणात उडी घेतली. मात्र रंगभूमीवरच्या या कसलेल्या अभिनेत्रीला बदललेल्या माध्यमाचा फटका बसला नाही. उलट तिने अधिक लक्षवेधी कामगिरी केली.

देविका दफ्तारदार ने अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. वास्तुपुरुष (२००२), देवराई (२००४), नितळ (२००६), एक कप च्या (२००९), हा भारत माझा (२०१२), संहिता (२०१३), अस्तु (२०१३), नागरीक (२०१५), कॅरी ऑन मराठा (२०१५), कासव (२०१६), परी हूँ मैं (२०१८), नाळ (२०१८), बेरीज वजाबाकी (२०१९) यांसाख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने खूप सुंदर भूमिका निभावल्या आहेत. जॉर्ज रेड्डी (२०१९) या तेलगू चित्रपटातही तिने काम केले आहे.

पण मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, की या अभिनेत्रीची सख्खी बहीण देखील अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहे? होय, देविका दफ्तारदारची सख्खी मोठी बहीण देखील एक अभिनेत्री आहे.

त्यांचे नाव आहे रेणुका दफ्तारदार. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) च्या अनेक व्हिडिओ मध्ये दिसणारी आणि आपल्या “शास्त्र असतं ते…” या डायलॉगने सगळे प्रसंग हलके फुलके करणारी आई म्हणजेच रेणुका दफ्तारदार. भाडीपा च्या व्हिडिओ मुळे रेणुका दफ्तारदार हे नाव आता घराघरांत पोचले आहे.

renuka daftardar
renuka daftardar

१९९६ ला प्रदर्शित झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दोघी’ या मराठी चित्रपटामुळे रेणुका दफ्तारदार प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी बरोबर त्यांनी गौरीची भूमिका साकारली होती.

त्यानंतर त्यांनी कैरी (२०००), दहावी फ (२००२), बाधा (२००६), घो मला असला हवा (२००९), विहीर (२००९), हा भारत माझा (२०१२), मन फकीरा (२०२०) या चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत. भाडीपा च्या ‘आई’ च्या भूमिकेमध्ये या गुणी अभिनेत्रीने खूप छान रंग भरले आहेत.

या दोन्ही दफ्तारदार भगिनी आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांची मने जिंकत आहेत. त्यांना अनेक नवनवीन विषयांच्या चित्रपटांमध्ये विविध रंगाच्या भूमिका करताना बघायची प्रेक्षकांची खूप इच्छा आहे.

आगामी काळात या दोघी प्रेक्षकांची ही अपेक्षा नक्की पूर्ण करतील अशी आशा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून या दोघींना शुभेच्छा!

You might also like