एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी देखील आहे याच क्षेत्रात! दिसते खूपच सुंदर…

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे जिथे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत नसतात. काही गोष्टी अशा असतात ज्या समजल्यावर त्यावर विश्वास बसणे कठीण होते. आज आपण अशाच एका जोडीबद्दल जाणून घेणार आहोत. कोण आहे ही जोडी? या जोडीतली एक व्यक्ती आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेलं हे नाव. ‘बॉलिवूडची आई’ या टोपणनावाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व.

बालकलाकार म्हणून सुरू झालेला रीमा लागूंचा प्रवास मालिका, नाटक आणि चित्रपट अशा क्षेत्रांत मुशाफिरी करत राहिला. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ हा मराठी चित्रपटाने त्यांची खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनय कारकीर्द सुरू झाली.

हिंदी मधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका केल्या. यांपैकी कयामत से कयामत ताक (१९८८), मैंने प्यार किया (१९८९), साजन (१९९१), गुमराह (१९९३), जय किशन (१९९४), हम आपके है कौन (१९९४), रंगीला (१९९५), कुछ कुछ होता है (१९९८), हम साथ साथ है (१९९९), वास्तव (१९९९), कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधल्या त्यांच्या आईच्या भूमिकांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. त्यांची सासू-सुनेच्या नात्यावर आधारीत ‘तू तू मैं मैं’ ही मालिका देखील प्रचंड गाजली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

रीमा लागूंनी बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. दुर्दैवाने या गुणी अभिनेत्रीचे १७ मे २०१७ रोजी नि’ध’न झाले. वर नमूद केल्याप्रमाणे त्या जोडीतील दुसरी व्यक्ती आहे रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू. बऱ्याच जणांना या माय-लेकीच्या नात्याबद्दल माहिती नाही. मृण्मयी देखील आपल्या आईसारखीच अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम नाट्य दिग्दर्शिका देखील आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

मृण्मयीचे वडील विवेक लागू हेदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. मृण्मयीचे डिसेंबर २०१४ मध्ये विनय वायकुळ बरोबर लग्न झाले. विनय देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो. मृण्मयीने ‘३ इडियट्स’ आणि ‘तलाश’ सारख्या हिंदी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.

तिला नृत्याची आवड असून भरतनाट्यम, जॅझ आणि सालसा या नृत्यप्रकारांमध्ये ती प्रवीण आहे. मृण्मयीला पाहता आईचे गुण मुलीत उतरल्याचे दिसते. तिची नाट्यभूमीची जाण तिला एक उत्तम नाट्य दिग्दर्शिका होण्यास मदत करते. काय मग मंडळी, कशी वाटली ही आई-मुलीची जोडी?

You might also like