एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको’ खऱ्या आयुष्यातील राधिका-शनायाची स्टोरी कॅमेऱ्यात कैद

पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. त्यामुळेच बहुधा नवऱ्यांना शिस्त लावायचं काम बायका फार मनापासून करताना दिसतात. कधी काही चुकलंच तर नवऱ्याला साम, दाम, दंड, भेद वापरून वठणीवर आणायलाही त्या मागे पुढे बघत नाहीत.

औरंगाबादमध्ये असेच एका कर्तव्यदक्ष बायकोने आपल्या नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी हे सगळे मार्ग वापरत त्याला सुतासारखा सरळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अजून कुणीतरी बायकोच्या तडाख्यात सापडले आहे.

बाटलीच्या नादाला लागलेला नवरा एकवेळ बायका सहन करू शकतात, पण बाईच्या मागे लागलेला नाही. औरंगाबादमधील एका महिलेलाही हे सहन झाले नाही आणि मग तिच्यातली स्त्री शक्ती जागी झाली. ती केवळ जागीच झाली नाही, तर या शक्तीत किती ताकद आहे हेदेखील तिने दाखवून दिले.

आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फिरताना पाहून या महिलेने जे केले, ते बघून तुम्हाला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचा ‘मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको’ हा संवाद आठवल्याशिवाय राहणार नाही.

औरंगाबादमधील या महिलेचा आपल्या पाटीवर संशय होता. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पत्नीने पतीवर पाळत ठेवायला सुरुवात केली. एक दिवस पत्नी आपल्या पतीचा पाठलाग करत होती. त्यावेळी तिच्या लक्षात आले, की तिचा पती आणि त्याची मैत्रीण कारमधून कुठेतरी जात आहेत. थोडे पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आले की ते दोघे औरंगाबादच्या वरद गणेश मंदिराजवळील एका हॉटेल मध्ये जात आहेत. पत्नीने वेळ साधत या दोघांना गाठले.

पतीला त्याच्या प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा संताप अनावर झाला आणि तिने या प्रकरणाचा निकाल लावायचा ठरवत गोष्टी आपल्या स्टाईलने सोडवायचा प्रयत्न केला. एवढ्यावरच ती महिला थांबली नाही. तिने पतीच्या मैत्रिणीला धू धू धुतले. आपल्या पतीला वठणीवर आणायला देखील ती विसरली नाही. आपल्या पतीच्या श्रीमुखात भडकावत तिने त्यालाही त्याच्या वागण्याचा प्रसाद दिला.

हा सगळा ‘माझ्या नवऱ्याच्या बायकोला’ धडा शिकवण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे नवऱ्यांनो, जरा सावध राहा. असले काही प्रकार करण्यापूर्वी तुमच्या बायकोमध्ये एक दुर्गेचे रूप असून ते विशेषतः अशा प्रसंगी रौद्ररूप धारण करू शकते हे लक्षात ठेवा.

विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा: क्लिक करा
Source:divyamarathi.bhaskar.com

You might also like