एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

क्रिकेटरच्या घरात राजकारणाची बॅटींग! रवींद्र जडेजाच्या पत्नी आणि बहिणीत पडली वादाची ठिणगी…

प्रत्येक नात्याची आपली अशी ओळख असते. प्रत्येक नात्याला आपले कंगोरे असतात. नणंद-भावजयीचे नाते हे देखील त्यातलेच एक. तसे तर हे नाते फार खेळीमेळीचे असते. पण काही घरांत मात्र दोघींमध्ये कडाक्याची भां’डणं होताना दिसतात. आता अशीच भां’डणं एका प्रसिद्ध घरातही पाहायला मिळाली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ म्हणतात, त्याप्रमाणे या घरातही नणंद आणि भावजयीमध्ये विस्तव जाताना दिसत आहे. हे घर आहे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याचं.

रवींद्र जडेजाची पत्नी आणि बहीण गुजरातच्या राजकारणातील मोठी व्यक्तिमत्वं आहेत. सध्या या दोघींमध्ये वा’दाची ठिणगी पडली असल्याने राजकारणाच्या शौकिनांसह क्रीडा रसिकांचेही लक्ष या भांड’णांकडे लागले आहे. जडेजाची पत्नी रिवा आणि बहीण नयना यांच्यात सध्या राजकीय युद्ध सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. रिवा जडेजा भाजप नेता असून नयना जडेजा काँग्रेस कार्यकर्ती आहे. रिवा सौराष्ट्रच्या करणी क्षत्रिय सेनेची अध्यक्षा आहे. तसेच ती समाजसेवेतही कायम सक्रीय असते.

भाजप आणि काँग्रेसच्या वा’दामुळे जडेजाच्या घरातही याच्या ठिणग्या पडल्या आहेत. या बायको विरुद्ध बहीण या वादात रवींद्र जडेजा मात्र बायकोच्या बाजूने आहे. रवींद्र जडेजाच्या बहिणीला म्हणजेच नयनाला मात्र तिची दुसरी बहीण आणि वडिलांचा पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाहेरचे राजकारण आता घरात घुसले असून घरातली शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरत आहे.

काय आहे वा’दाचे कारण…?
एका राजकीय कार्यक्रमावरून ही खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. रवींद्र जडेजाची बायको रिवा जडेजा च्या एका राजकीय कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अशात रिवाने सुद्धा आपल्या तोंडाला नीट मास्क लावला नव्हता. याच प्रसंगाचा आधार घेत रवींद्र जडेजाची बहीण नयना जडेजाने आपल्या भावजयीवर टी’का केली आहे. ‘गुजरातमध्ये को’रोनाची तिसरी लाट आणण्यासाठी या काम करीत आहेत’ अशा शब्दांत नयनाने रिवावर निशाणा साधला आहे.

खरंतर ऑगस्ट २०२० मध्ये देखील रिवा याच कारणाने वा’दाच्या भोवऱ्यात सापडली होती. मास्क न घालण्यावरून ती गेल्या वर्षी वा’दात सापडली होती. कारमधून जाताना तिने मास्क न घातल्याने पोलिसांनी तिला अडवले होते. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी तिने पोलिसांशीच वा’द घालायला सुरवात केली होती. प्रसार माध्यमांमुळे हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा रिवावर नणंदेकडून टीका होताना दिसत आहे.

You might also like