एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रविना टंडनची मुलगी दिसते तिच्यासारखीच बोल्ड अँड ब्युटीफुल! फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल..

नव्वद चे दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यातल्या बहुतेक जणींची लग्नं झाली असून त्यांची मुले आता बरीच मोठी झाली आहेत. काही अभिनेते-अभिनेत्रींची मुलं आपल्या आई-वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत, तर काही मात्र पडद्यापासून लांब राहणेच पसंत करत आहेत. काही स्टार किड्स तर अगदी आपल्या पालकांचे तरुणपण जगत आहेत असं वाटावं इतकं त्यांच्यात साम्य आहे.

अशीच एक अभिनेत्री आहे रविना टंडन. अनेक विनोदी चित्रपटांमध्ये ती आपल्याला गोविंदा बरोबर दिसली आहे. ‘मोहरा’ सारखे गंभीर चित्रपटांमधून तिने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. रविना वर चित्रित झालेलं ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं तर आजही तरुणाई मोठ्या आवडीने ऐकते. एकंदरीत तिचे चित्रपट पाहता रविना टंडन खूपच सुंदर त्याप्रमाणेच बोल्डही होती. तिचे हेच गुण तिच्या मुलीमध्ये उतरले आहेत.

२००४ मध्ये रविना ने फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानी याच्याशी लग्न केलं. २००५ मध्ये तिनं आपल्या मुलीला म्हणजेच राशा ला जन्म दिला. २००८ मध्ये तिला रणबीरवर्धन नावाचा मुलगा झाला. मॉडेल म्हणून करिअर ला सुरुवात केलेली रविना लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूर झाली. तिने आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. रविना सहसा कॅमेऱ्यापासून दूर असते. तसेच ती आपल्या मुलांनादेखील कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.

रविनाच्या मुलीचा म्हणजेच राशा चा वाढदिवस झाला आणि या दोघींचे एकत्र फोटो सोशल मीडिया वर बरेच व्हायरल झाले. हिरव्या वन-पीस मध्ये राशा खूपच सुंदर आणि बोल्ड दिसते आहे, पण ती तितकीच निरागस देखील दिसते आहे.

तिला पाहून आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची रविना सगळ्यांना आठवली. तीदेखील त्यावेळी अशीच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसायची. आतादेखील तिच्या सौंदर्यात काही कमी नाहीये. तिची मुलगी देखील तिच्यासारखीच दिसते. राशा आपल्या आईच्या खूप जवळ आहे.

Third party image reference

खरंतर रविना ला एकूण चार मुले आहेत. लग्नापूर्वी तिने १९९५ मध्ये दोन मुलींना दत्तक घेतले होते. यातली मोठी मुलगी पूजा त्यावेळी अकरा वर्षांची तर छोटी मुलगी छाया आठ वर्षांची होती. मात्र ती आपल्या मुलांना कॅमेऱ्यापासून लांबच ठेवणे पसंत करते. कॅमेऱ्यापासून लांब आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याकडे रविना चा कल आहे असे दिसते. ही ‘शहर की लडकी’ थोडा वेळ काढून नव्या चित्रपटांमध्ये दिसावी, अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

You might also like