एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कुली’ मधील हा बालकलाकार आता आहे ३०० कोटी कंपनीचा मालक, दिसतो असा पहा..

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात कलाकारांप्रमाणेच चित्रपटांमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका साकारणारे बालकलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले होते. या काळात बिग बी अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांची बालपणीची भूमिका साकारणारे बालकलाकार देखील त्यांच्याइतकेच प्रसिद्ध झाले होते. अमिताभ यांची बालपणीची भूमिका साकारणारा असाच एक बालकलाकार होता मास्टर रवी.

कुली, अमर अकबर अँथनी, देशप्रेमी, शक्ती अशा तब्बल ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यावेळी मास्टर रवी ने बालकलाकार म्हणून काम केले होते. ऐकून आश्चर्य वाटले ना? हे सगळं वाचून तुम्हाला ‘आता हा मास्टर रवी कुठे असतो? काय करतो?’ असे प्रश्न नक्कीच पडले असतील. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही आज हे नाव सिनेसृष्टीत कुठेच कसे दिसत नाही, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया की मास्टर रवी आता कुठे असतो आणि काय करतो ते.

मास्टर रवीचे पूर्ण नाव आहे रवी वलेचा. बालवयात अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला हा मुलगा नंतर चित्रपटसृष्टीची ही झगमगती दुनिया सोडून दुसऱ्याच क्षेत्रात नाव कमावण्यासाठी प्रयत्न करू लागला.

सिनेसृष्टीला रामराम ठोकून त्याने आपले सगळे लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. करिअर म्हणून अभिनय न निवडता त्याने व्यवस्थापन विषय निवडला. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून त्याने एमबीए ची पदवी घेतली.

सेवा क्षेत्रातील जाणकार मंडळींशी चर्चा करून अखेर हॉस्पिटॅलिटी सेवा देणारी स्वतःची कंपनी सुरू केली. संबंध भारतातील प्रायव्हेट सेक्टर मध्ये असलेल्या नामांकित बँकांना त्याच्या कंपनीने हळूहळू सेवा पुरवण्यास सुरुवात केली. आपला व्यवसाय वाढवत त्याने या क्षेत्रात आपला जम बसवला. आज त्याच्या कंपनीचे नाव हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे.

त्याची कंपनी ही केवळ एक कंपनी न राहता आता तो एक ब्रँड बनला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रवीने आपल्या नावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्याचा हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याचा त्याचा मानस आहे. चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या छोट्या भूमिका करणारा मास्टर रवी आता एक यशस्वी व्यावसायिक रवी वलेचा बनला आहे.

तो आता जवळपास ३०० कोटीच्या अफाट संपत्तीचा मालक बनला आहे. केवळ बाहेरच्या झगमटाला न भुलता स्वतःच्या कष्टावर नाव मोठे केलेल्या या व्यावसायिकाकडून नव्या पिढीला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.

You might also like