एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रात्रीस खेळ चाले ३’ फेम अपूर्वा नेमळेकर सुरू करतेय ‘हा’ नवा व्यवसाय

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका झी मराठी वाहिनी वर पुन्हा सुरू झाल्याने या मालिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आण्णा आणि शेवंताला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट बघत होते.

लॉकडाऊनमुळे या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली. मालिकेतले कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेच्या प्रसारणाची वेळ जरी बदलली असली तरी प्रेक्षकांच्या मनातली या मालिकेची जागा अजूनही कायम आहे.

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम रीतीने वठवल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेचे, यातल्या व्यक्तिरेखांचे आणि त्या साकारणाऱ्या कलाकारांचे चाहते आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा लोकांनी या मालिकेला खूप छान प्रतिसाद दिला.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

त्यामुळे निर्मात्यांनी या मालिकेचा दुसरा भाग ‘रात्रीस खेळ चाले २’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केला. त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभला. आता त्याचा पुढील भाग ‘रात्रीस खेळ चाले ३’ ला देखील प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत.

या मालिकेतील प्रचंड गाजलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे आण्णा आणि शेवंता. शेवंताची व्यक्तिरेखा साकारली आहे अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने. अभिनयाबरोबरच अपूर्वा आता व्यवसायात उतरत आहे. अपूर्वा जसा उत्तम अभिनय करते, तसाच ती चांगला व्यवसायही करते आहे.

View this post on Instagram

A post shared by Apoorva Nemlekar (@apoorvacollections.in)

‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये काम सुरू करण्यापूर्वी तिने आपला ‘अपूर्वा कलेक्शन्स’ हा व्यवसाय सुरू केला होता. पहिल्यांदा ती आपल्या या ब्रँड नेम खाली आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्याचे काम करत होती.

आता तिने आपला व्यवसाय वाढवला असून आता ती ‘अपूर्वा कलेक्शन्स’ या ब्रँड नेम खाली साड्यांचे कलेक्शन विकणार आहे. हे कलेक्शन साताऱ्यामध्ये पाहता येणार आहे. नुकतेच तिने आपल्या या नवीन व्यवसायाचे उद्घाटन केले. यावेळी तिची आईदेखील उपस्थित होती. या उद्घाटनाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Apoorva Nemlekar (@apoorvacollections.in)

शाहूपुरी रोड वरील शुक्रवार पेठेत येथील सरस्वती कॉम्प्लेक्स मध्ये तिने आपले हे साड्यांचे भव्य दुकान सुरू केले आहे. नागरिकांनी पहिल्याच दिवशी दुकानात गर्दी केली होती. तिच्या व्यवसायाची माहिती देणारी वेबसाईट देखील आहे ज्यावर तुम्हाला साड्यांचे कलेक्शन आणि त्यांच्या किंमती देखील पाहता येणार आहेत. अपूर्वाला तिच्या या नवीन व्यवसायासाठी खूप शुभेच्छा!

You might also like