एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रश्मिका जाऊ इच्छिते या अभिनेत्याबरोबर डे’ट वर! कोण आहे तो- विजय देवरकोंडा की अजून कोणी?

अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणजे एक क्यूट फेस. पण फक्त एवढीच तिची ओळख नाहीये. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अत्यंत कमी वयात आणि कमी काळात खूप प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. आपल्या कामामुळे केवळ दक्षिणेतच नाही, तर अखंड भारतात तिचे चाहते आहेत.

पण रश्मिकाने आपल्या कामाची मर्यादा केवळ दाक्षिणात्य चित्रपटांपुरती मर्यादित ठेवली नाहीये. आता ती एका चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील पदार्पण करत आहे.

रश्मिका ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले असून सोशल मीडिया वरील तिच्या पोस्ट्स मधून ती हे शूटींग एन्जॉय करत असल्याचे दिसते.

तर अशा या गुणी अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेतले नाही तर ते चाहते कसले! या गोड अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे.

रश्मिकाने आपला प्रियकर रक्षित शेट्टी याच्याबरोबरचा साखरपुडा काही वर्षांपूर्वी मोडला होता. त्यामुळे तिच्या आयुष्यात कोणत्या नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे का किंवा तिचे कोणावर प्रेम आहे का, याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आसुसले आहेत.

रश्मिकाचे नाव तिच्याबरोबर चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा अभिनेता विजय देवरकोंडा बरोबर जोडले जाऊ लागले. मात्र आता स्वतः रश्मिकानेच या चर्चांना विश्रांती दिली आहे. तिने आपला क्रश कोण आहे याचा खु’ला’सा केला आहे.

रश्मिकाने नेहमीच तिच्या विश लिस्ट मधल्या गोष्टी तिच्या चाहत्यांना सांगितल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले आघाडीचे कलाकार नागा चैतन्य आणि प्रभास या अभिनेत्यांबरोबर तिला काम करायचे आहे, अशी इच्छा तिने अनेक वेळा व्यक्त केली आहे.

कोणाबरोबर डे’ट वर जायला आवडेल असे विचारले असता तिने ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास बरोबर असे उत्तर दिले. विजय देवरकोंडा आणि तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे ती क्रशबद्दल विचारले असता विजयचे नाव घेईल असे बऱ्याच जणांना वाटले.

मात्र प्रभासचे नाव ऐकून सगळ्यांनाच ध’क्का बसला. रश्मिका प्रभासची फॅन आहे. प्रभास आपला क्रश असून त्याच्याबरोबर डे’ट वर जायला नक्की आवडेल असे तिने एका मुलाखतीत सांगितले. त्यामुळे आता तिचे चाहते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना रश्मिका आणि प्रभास ला घेऊन चित्रपट करण्याची विनंती करत आहेत.

You might also like