एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फोटोतल्या या क्यूट अभिनेत्रीला ओळखले का? बॉलिवूडमध्ये होत आहे नव्या चेहऱ्याची एन्ट्री..

रश्मिका मंदाना हे तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतलं गाजलेलं नाव. २०१६ ला कन्नड चित्रपटातून पदार्पण करत रश्मिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रश्मिका मूळची कर्नाटकची आहे. कॉलेज मध्ये शिकत असल्यापासून ती मॉडेलींग करत होती. तिने त्यावेळी अनेक जाहिरातींमध्ये देखील कामे केली आहेत. तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता रश्मिका बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका आपला बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू बागची करणार आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटानंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्याबरोबर ‘मिशन मजनू’ या चित्रपटाची देखील निर्मिती करणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

हा चित्रपट पाकिस्तानच्या भूमीवरील भारताच्या रॉ ऑपरेशन ची कथा सांगतो. १९७० मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध आखलेल्या धाडसी मोहिमेने भारत-पाकिस्तान संबंध बदलून गेले होते.

रश्मिका सोशल मीडिया वर सतत कसले ना कसले फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत ती म्हणते, “कोरोना जाण्याची वाट बघत आहे”. या फोटोमध्ये रश्मिका खूपच क्यूट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने सिद्धार्थ मल्होत्रा सोबतचा आपला फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ‘मिशन मजनू’ चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्याची बातमी दिली होती. या फोटोमध्ये तिच्या आणि सिद्धार्थ च्या हातात ‘मिशन मजनू’ चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये ती लिहिते, की “माझी टीम जॉईन करण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही. चला, मिशन सुरू होऊ द्या.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

‘मिशन मजनू’ चित्रपटाची कथा परवेज शेख, असीम अरोरा आणि सुमित बठेजा यांनी लिहिली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या थ्रिलर चित्रपटात एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटामध्ये परमित सेठी, शारीब हाश्मी, झाकीर हुसेन, अर्जन बाजवा यांसारखे कलाकारही आहेत. रश्मिकाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक नवी पर्वणी ठरेल अशी आशा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका सारख्या दाक्षिणात्य अभिनेत्रीची बॉलिवूड एन्ट्री हा बॉलिवूडच्या प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. याआधीही काजल अगरवाल, श्रुती हसन, त्रिशा, असीन, जेनेलिया डिसूझा यांसारख्या बऱ्याच दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे रश्मिका च्या बॉलिवूड पदार्पणाकडे सगळेच नजर ठेवून आहेत.

You might also like