एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या चिमुकलीला ओळखले का? ‘या’ प्रसिद्ध मालिकेत केले आहे काम…

मित्रांनो, या फोटोत दिसणारी चिमुकली ओळखीची वाटते का? आज ही अभिनेत्री मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने एका प्रसिद्ध मालिकेत काम केल्यानंतर सगळा महाराष्ट्र तिला ओळखू लागला आहे. या अभिनेत्रीने झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत एक प्रसिद्ध भूमिका निभावली होती. आता तरी ओळख पटली का?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

तर मंडळी, ही चिमुकली आहे अभिनेत्री रसिका सुनील. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिने केलेल्या शनायाच्या भूमिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्याआधी तिने ‘पोश्टर गर्ल’ (२०१६) चित्रपटात ‘कशाला लावतोय न्हाट’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले होते. अभिनेत्री असण्याबरोबरच रसिका एक उत्तम डान्सर देखील आहे. ती क्लासिकल डान्सर असून तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. रसिका उत्तम गातेसुद्धा. तिने भारतीय शास्त्रीय गायनात संगीत विशारद देखील केले आहे.

रसिका मूळची अकोल्याची असून तिचा जन्म ३ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. कॉलेज मध्ये असताना तिने अनेक युथ फेस्टिवल्स आणि नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. या मालिकेच्या दरम्यान ती मध्येच मालिका सोडून लॉस अँजेल्स ला ऍक्टिंग वर्कशॉप मध्ये भाग घेण्यासाठी गेली होती. तेथून परत आल्यावर तिने पुन्हा या मालिकेत काम सुरू केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. बघतोस काय मुजरा कर (२०१७), बस स्टॉप (२०१७), गॅट-मॅट (२०१८), गर्लफ्रेंड (२०१९) या चित्रपटांमध्ये तिने वैविध्यपूर्ण भूमिका निभावल्या. २०१९ मध्ये तिने ‘वाईल्ड गीज’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहे. ‘तुम बिन मोहे’ या म्युझिक व्हिडिओ साठी तिने अभिनय करण्याबरोबरच गायन आणि दिग्दर्शन देखील केले आहे.

रसिका सोशल मीडिया वर देखील खूप सक्रीय असते. नुकतीच तिने आपण लग्न करणार असल्याची घोषणा सोशल मीडिया वर केली आहे. तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी बरोबर ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही गेल्या वर्षीपासून एकमेकांना डे’ट करत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये रसिकाने आदित्य बरोबरचे आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

मित्रांनो, तुम्हाला रसिका सुनील आवडते का? तिच्या अभिनयाबद्दल तुमचे काय मत आहे? आम्हाला तुमचे मत कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तसेच आमचे तुम्हाला आवडलेले लेख जरूर लाईक आणि शेअर करा.

You might also like