एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पैसा नाही तर प्रेमही नाही! राणू मंडलच्या मुलीने सोडले आईला वाऱ्यावर…

कुणाचं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. एका महिलेला एका प्रसिद्ध संगीतकारानं रस्त्यावर गाताना बघितलं आणि तिचा आवाज ऐकून तिला आपल्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी देखील दिली. जिचे अस्तित्व देखील कोणाला माहीत नव्हते, अशी महिला रातोरात सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली. कोणत्याही चित्रपटाला शोभेल अशी ही कथा. पण सगळ्याच कथांचा शेवट गोष्टीतल्या सारखा चांगला होत नसतो.

हिमेश रेशमिया या प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकाराने एकदा एका भिकारी महिलेला गाताना बघितलं. राणू मंडल असं या महिलेचं नाव. तिचा आवाज ऐकून हिमेशने चक्क तिला त्याच्या पुढच्या चित्रपटात गायची संधी देखील दिली! अनेक गायक आपला आवाज जगाला ऐकवण्याची एक संधी मिळावी म्हणून दिवसरात्र धडपडत असतात. मात्र राणूला काही क्षणांतच ही संधी मिळून गेली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranu Mondal (@ranu.mondal.official)

या घटनेची बरीच प्रसिद्धी झाली. ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात राणू रातोरात प्रसिद्ध झाली. पैसा, प्रसिद्धी, राहायला मोठं घर अशी तिची स्वप्नं रातोरात पूर्ण झाली. बॉलिवूड मध्ये गाण्याची संधी मिळत नसली तरी अनेक टीव्ही रिऍलिटी शो मध्ये तिला बोलावणं येत होतं.

अशा शो मध्ये हजेरी लावणं हे देखील तिच्या कमाईचंच एक साधन होतं. मात्र कॅमेऱ्यासमोर देखील राणूचा अहंकार दिसायचा. आपल्या चाहत्यांबरोबर आणि प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना देखील तिचा उद्धटपणा जाणवायचा. आपल्या स्वभावामुळे तिने सगळं गमावलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranu Mondal (@ranu.mondal.official)

अशातच तिच्या मुलीने तिची साथ सोडली आहे. राणूला प्रसिद्धी मिळाल्यावर तिची मुलगी तिच्याकडे राहायला आली होती. चांगल्या दिवसांत तिच्या मुलीने तिची साथ दिली होती. मात्र जसजसे पैसे संपू लागले आणि पुन्हा राणूवर भीक मागायची वेळ आली, तेव्हा मुलीने देखील तिची साथ सोडली आहे. राणू आता पूर्वीसारखीच एकटी पडली आहे.

विशेष म्हणजे अशा परिस्थितीतही राणूला हिमेशने तिला पुन्हा मदत करावी अशी अपेक्षा आहे. आपल्यामुळेच हिमेशचे गाणे हिट झाले असून त्याने त्यातून कोट्यवधी रुपये कमावले असल्याचे राणूचे म्हणणे आहे. अशा वेळी त्यानेच आपल्याला पुन्हा मदत करावी अशी अपेक्षा राणू मंडल बाळगून आहे.

आता तर तिच्यावर एक चित्रपट बनणार असल्याचीही बातमी आहे. ‘मिस राणू मारिया’ असे त्याचे नावही ठरले आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. ऋषिकेश मंडल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अभिनेत्री इशिका डे प्रमुख भूमिकेत असणार आहे.

You might also like