एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिर्थडे! बॉलिवूड मधील हा चमकता तारा, ज्याने गाडी धुण्यापासून टॅक्सी चालवण्यापर्यंत सर्व काम केले…

मित्रानो बॉलिवूड मध्ये काम करणे ही सोप्पी गोष्ट न्हवे यासाठी खूप मशागत करावी लागते खूप साऱ्या कष्टातून वर जावे लागते. आज आम्ही बॉलिवूड मधील अश्याच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने गाडी धुण्यापासून रेस्टॉरंट मध्ये देखील काम केलं आहे. या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नाव आहे रणदीप हुड्डा.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मूळचे हरियाणाचे आहेत. यामध्ये जयदीप अहलावत, सतीश कौशिक, राजकुमार राव, यशपाल शर्मा या नावांचा समावेश आहे. परंतु या सर्व नावांमध्ये एक नाव आहे ज्याने बॉलिवूड मध्ये खूप सारी प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक वेळा हरियाणवीचे पात्र साकारले आहे. हे नाव दुसरे कोणते नसून रणदीप हुड्डा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

आत्तापर्यंत रणदीप यांनी ३२ चित्रपटात काम केलं आहे ते २ दशकापासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांची पहिली फिल्म २००१ साली आली होती ज्याचे नाव होते मानसून वेंडिंग, या चित्रपटात त्यांनी एनआरआईचा रोल प्ले केला होता बॉलिवूड मध्ये आपले नाव करणारे रणदीप यांचा जीवनप्रवास देखील खूपच रंजक आहे. २० ऑगस्ट दिवशी ते आपल्या वयाची ४५ शी गाठणार आहेत. त्यांच्या जन्मदिवस निमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणार आहोत.

हरियाणाच्या रोहतक मध्ये राहणाऱ्या रणदीप यांचा जन्म १९७६ मध्ये झाला होता, त्यांचे वडील एक सर्जन होते तर आई एक समाजसेविका. जेव्हा रणदीप ८ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना एमएनएसएस बोर्डिंग शाळेत दाखल केले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले इथे थोडा वेळ शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते ऑस्ट्रेलियात मेलबर्न मध्ये गेले. तिथे त्यांनी मार्केटिंग आणि बिजनेस मॅनेजमेंट याचे शिक्षण घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

ऑस्ट्रेलियात शिकत असताना त्यांनी चायनीज रेस्टॉरंट मध्ये काम केलं, गाडी धुण्याचे काम केले एवढच नाही तर त्यांनी त्यावेळी टॅक्सी देखील चालवली आहे. २ वर्षानंतर ते भारतात आले तेव्हा त्यांना एयरलाइन्स मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये जॉब मिळाली.

त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी मीरा नायर यांची फिल्म मानसून वेंडिंग मध्ये काम केलं. अस म्हणतात की त्यांना ही फिल्म ऑस्ट्रेलियन एक्सेंट म्हणून मिळाली होती. या चित्रपटात दमदार काम केल्यानंतर त्यांना दुसरा प्रोजेक्ट ४ वर्षांनंतर मिळाला. यावेळी त्यांना रामगोपाल वर्मा यांची साथ मिळाली. त्यानंतर त्याचे आयुष्य चमकले.

You might also like