एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

यंदा पडणार का डोक्यावर अक्षता…? लग्नासाठी रणबीर-आलिया जोधपूरला रवाना…

बॉलिवूड मधील अजून एक कपल आता लग्नबंधनात अडकणार असं दिसतंय. गेले अनेक दिवस अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट एकमेकांना डे’ट करत आहेत. बऱ्याच वेळा दोघे लग्न करणार असल्याची अ’फवा येत होती. मात्र दोघांनीही याबाबत कोणतेच वक्तव्य केले नव्हते. आता मात्र दोघांचे लग्न होणार असं दिसतंय.

आलिया आणि रणबीर नेहमीच एकत्र दिसतात. कधी एकमेकांबरोबर सुट्टी एन्जॉय करताना, तर कधी कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवताना हे दोघे दिसतात. या दोघांनीही आपले नाते लपवून ठेवलेले नाही. दोघांच्याही चाहत्यांना हे दोघे काहीतरी चांगली बातमी देतील अशी अपेक्षा आहे. पण अजून ती बातमी मिळत नसल्याने सगळेच या बातमीकडे डोळे लावून बसले आहेत. आता मात्र चाहत्यांना लवकरच एक गुड न्यूज मिळणार असल्याचे दिसते.

रणबीर आणि आलिया यांच्या एका फोटोमुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. रणबीर आणि आलिया एकत्र जोधपूरला गेले आहेत. हाच फोटो व्हायरल झाला आणि आता दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट चार्टर विमानाने जोधपूरला पोचले आहेत. आगामी काळात दोघे या ठिकाणी लग्न करू शकतात, असे म्हटले जात आहे. सध्या ही जोडी जावई रिसॉर्टला रहात आहे. मात्र आगामी काळात उमेद भवन पॅलेस, मेहरानगढ किल्ला किंवा जोधपूरच्या आसपासच्या भागात रणबीर आणि आलियाचा भव्य विवाह सोहळा पार पडू शकतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

मात्र दोघांना एकमेकांशी खरंच लग्न करायचं आहे का? रणबीर कपूरने एका ज्येष्ठ पत्रकाराशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला होता. त्याने आपल्या आणि आलियाच्या लग्नाबद्दल पॉझिटिव्ह सिग्नल दिला होता. रणबीरने यावेळी सांगितले होते, की “जर कोरोनाचा विषय नसता, तर मी या वर्षी आलिया भटशी लग्न केलं असतं. मला या विषयावर जास्त बोलायचे नाही. मी फक्त एवढेच सांगू इच्छितो, की मी लवकरच आलियाशी लग्न करेन.”

आता हे लवकरच म्हणजे याच महिन्यात की या वर्षी हे मात्र अजून कळू शकले नाही. या दोघांची ही जोधपूर ट्रिप त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठी असू शकते, असे म्हटले जात आहे. अलीकडे सेलिब्रेटी परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी खरंच आलिया आणि रणबीर जोधपूरला लग्न करणार की तेही परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करणार, यावर मात्र अजून उत्तर मिळालं नाहीये.

You might also like