एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाॅलिवुडमधील या प्रसिद्ध खलनायकाचा असा झाला दुर्दैवी अंत, कारण वाचुन विश्वास बसणार नाही..

चित्रपट म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर नायक आणि खलनायक अशी दोन पात्रं समोर येतात. कारण कोणत्याही चित्रपटाचं संपूर्ण कथानक या दोन पात्रांना धरूनच पुढे सरकत राहते. ९० च्या काळात तर हमखास नायक – खलनायक हे चित्रपटात दिसायचे. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकाची भूमिका साकारलेली आहे.

पण काही खलनायक असे होते की ते पाहताना प्रेक्षकांना खरंच ते खलनायक असल्याचा भास व्हायचा. अर्थातच तो त्यांच्या उत्तम कलेचा नमुना असायचा.आज आपण वाचणार आहोत अशाच एका खलनायकाविषयी. आणि त्याच्या मृ’त्यू’च्या कारणविषयी. जे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

हा खलनायक ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आला आणि त्याने कमालच केली. साधारणपणे लोक नायकाला लक्षात ठेवतात. पण याची खलनायकाची भूमिका पाहून लोकांबरोबर चित्रपटाचे नायकही थक्क होऊ लागले. त्याच्या कलाकारीत तर दम होताच शिवाय त्याचा लूकही एखाद्या खऱ्याखुऱ्या व्हिलनला साजेसा होईल असाच होता. त्यामुळे त्याला पाहून लोक घाबरायचे. कधी तो ‘कर्नल चिकारा’ बनून भिती पसरवत असे तर कधी ‘अण्णा’ बनवून दहशत निर्माण करायचा.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारया या चित्रपट कलाकाराविषयी बोलत आहोत. हा अभिनेता म्हणजे रामी रेड्डी. तो त्या काळात नायकाच्या पलीकडे जायचा. म्हणजे याचं काम इतकं उठावदार असायचं की लोक हिरो सुद्धा विसरून जायचे. रामी रेड्डी याचे पूर्ण नाव ‘गंगासानी रामी रेड्डी’ होते. त्याचा जन्म आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातल्या वाल्मीकिपुरम गावात झाला. रामी रेड्डी याने त्याचं शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद इथून पूर्ण केलं तिथून त्याने पत्रकाराची पदवी घेतली. चित्रपटांमध्ये काम करण्यापुर्वी रामी रेड्डी पत्रकार म्हणून काम करायचा.

पत्रकार म्हणून काम करत असताना एका तेलगु चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. इथुनच मग त्याच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. पण पुढे त्याला बाॅलिवुडमधून ऑफर येऊ लागल्या तेव्हा तो स्वतः ला रोखू शकला नाही. तिथून पुढे त्याने हिंदी चित्रपटांमधून काम करायला सुरुवात केली. आणि त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. बाॅलीवूडमध्ये त्याने एकापेक्षा एक पात्रं साकारली. विशेष खलनायकाची भूमिका तो भक्कमपणे करू लागला. रामी रेड्डी याने सुमारे २५० चित्रपटांहून आधिक चित्रपटांत काम केले आहे.

१९९० च्या ‘बान’ चित्रपटात त्यांने अण्णा नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती. या भूमिकेत, रामा रेड्डीने असे काम केले की ते कायमचे संस्मरणीय बनले. रामा रेड्डीची भिती अशी होती की जेव्हा जेव्हा तो पडद्यावर येईल तेव्हा लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल. कारण अभिनयासोबत रामी रेड्डी खतरनाक दिसत होता. आणि याच कारणाने लोक त्याला घाबरायचे. त्याने संपूर्ण करियरमध्ये खलनायकाचीच भूमिका केल्याचे दिसून येते.

प्रत्येक चित्रपटात त्याचे पात्र आणि रूप इतके भयंकर आणि क्रूर होते की लोक त्याला पाहून हमखास घाबरायचे. रामीच्या आयुष्यातील सर्वात भयंकर वळण त्यावेळी आले जेव्हा एका गंभीर आ’जा’राने त्याला ग्रासले. यकृतायध्ये एक विकार झाला होता. ज्यामुळे तो अनेक वर्षे आजारी राहिला. एका कार्यक्रमात त्याला पाहिल्यावर सगळे शाॅक झाले. कारण इतका हट्टाकट्टा दिसणारा रामी आजारामुळे प्रचंड कमकुवत झाला होता. अखेर १४ एप्रिल २०११ मध्ये त्याचे नि’ध’न झाले. आणि बाॅलिवुडने एक खलनायक गमावला.

You might also like