एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रामायण’ मध्ये सीतेचा रोल करणारी हि अभिनेत्री इतक्या वर्षांनी दिसते अशी, मालिकेत काम करण्याआधी करायची B-ग्रेड चित्रपटात काम..

१० एक वर्षापाठीमागे सर्वांच्या घरी एकच मालिका लागायची ती म्हणजे ‘संपूर्ण रामायण’, पण ह्या रामायण मध्ये काम करणाऱ्या कलाकार कोण होते हे माहीत आहे का ? तर मित्रांनो आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. निर्माता रामानंद सागर यांची फेमस सिरीयल रामायण ह्यामध्ये सिताची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया ५६ वर्षांची झाली आहे. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९६५ मध्ये मुंबईत झाला होता.

दीपिका जेव्हा १४ वर्षांची होती तेव्हाच तिने ऍड मध्ये वैगेरे काम करण्यास सुरवात केली होती. त्यांचा वडिलांना दीपिका फिल्म्समध्ये काम करणे पसंद न्हवते पण त्यांच्या आईने त्यांना आधीपासूनच सपोर्ट करत आली.

दीपिका जेव्हा रामायण मध्ये काम करणार होती तेव्हा त्यांचे वय फक्त १६ वर्ष एवढेच होते. ती अजून सुद्धा खूप ग्लॅ’मरस स्टाईल मध्ये जगते, आत्ताच्या वयात सुद्धा त्या खूप सुंदर दिसतात तुम्हाला बगून विश्वास बसणार नाही.

खरंतर दीपिकाला सीताचा तो महत्वाचा रोल लगेच नाही मिळाला, ह्या रोलसाठी सुमारे २५ लोकांनी स्क्रीन टेस्ट दिली होती. त्या टेस्ट मध्ये आवाज, चेहऱ्यावरील हाव भाव, चालणे फिरणे ह्या सर्व गोष्टी बारकाईने बघितल्या जाईत होत्या. पण ह्या रोल मुळे दीपिकाचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.

दीपिका ‘रामायण’ सिरीयलच्या आधी खुप साऱ्या चित्रपटात देखील काम केली आहेत, ‘भगवान दादा’ (1986), ‘रात के अंधेर में’ (1987), ‘खुदाई’ (1994), ‘सुन मेरी लैला’ (1985), ‘चीख’ (1986), ‘आशा ओ भालोबाशा’ (बंगाली, 1989) और ‘नांगल’ (तमिल, 1992) ह्यामध्ये त्या अभिनेत्री म्हणून उत्तम भूमिका करत होत्या.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ह्यातील खूप साऱ्या फिल्म्स बी -ग्रे’ड होत्या, २०१७ मध्ये दीपिका गुजराती सिरीयल ‘छुटा छेड़ा’ ह्यामध्ये दिसली होती एवढच नाही तर तिने डायरेक्टर मनोज गिरी यांचा चित्रपट ‘गालिब’ मध्ये देखील काम केलं आहे.

दीपिकाने हेमंत टोपीवाला यांच्यासोबत विवाह केला आहे जे श्रुंगार बिंदी आणि टिप्स एंड टोज नेलपॉलिश यांचे मालक आहेत. दीपिका आणि हेमंतला दोन मुली आहेत निधि टोपीवाला आणि जूही टोपीवाला.

माहितीनुसार लग्नानंतर दीपिकाने आपलं आडनाव बदलून घेतले आहे, आत्ता ती आपल्या पतीच्या मार्केटिंग टीमची हेड म्हणून काम करते आहे. दीपिका आपल्या रिकाम्या वेळेत पेंटिंग करत असते.

You might also like