एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शिल्पा शेट्टीच्या पतीला राखी सावंतचा पाठिंबा, म्हणाली काय केलं एवढ वाईट..

गेल्या सोमवारी सोशल मिडियावर एकाच बातमीने रान उठवलं. ती म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती व शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याला अ’ट’क. अ’श्लील चित्रफित बनवून ते ॲपवर डाऊनलोड केल्याप्रकरणी त्याला ही अ’टक झाली होती. त्यानंतर राज कुंद्रा सोबत शिल्पा शेट्टीलाही सोशल मिडियावर ट्रोलर्स ना टसामोरं जावं लागतं होतं.

राज कुंद्रा ला २० जुलै ला कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणात त्याचा जोडीदार असलेल्या रायन थारोपे याला २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या राज कुंद्रा ला भायखळ्याच्या तु’रूं’गात दाखल केले आहे.

जेव्हा राज कुंद्रा च्या अ’टकेची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली तेव्हा नेटकऱ्यांनी अक्षरशः मीम्सचा पाऊस पाडला. एका अर्थाने प्रचंड प्रमाणात ट्रो’ल राज कुंद्रा ला केलं जात आहे. सर्वसाधारणपणे सर्वच जण राज कुंद्रा च्या विरोधात बोलत असताना बाॅलिवुड ची एक अभिनेत्री तिने मात्र चक्क राज कुंद्रा ला पाठिंबा दर्शविला आहे.

ही अभिनेत्री सुद्धा आपल्या वा’द’ग्रस्त वक्तव्य आणि बोल्डपणामुळे सतत चर्चेत असते. राज कुंद्रा ला पाठिंब्याच्या विधानामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत हिने हे वक्तव्य केले आहे. पाहुया तिच्या विधानात ती काय म्हणतीये.

राज कुंद्रा ला अ’टक झाल्यानंतर मुंबई च्या मिडियाने राखीला राज आणि शिल्पा बद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “शिल्पा ने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये खुप मेहनत करत यश मिळविले आहे. शिल्पा आणि राज यांचे नाव कुणीतरी खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या परिवाराला बदनाम केलं जात आहे. माझा विश्वासच बसत नाही राज असं काय कर शकतो.

राज एक चांगला व्यक्ती आहे. तो एक उद्योगपती असण्याबरोबरच शिल्पाचा नवराही आहे. कोणीतरी त्यांना ब्लॅ’क’मेल करत असून त्याचे आणि शिल्पाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना शांततेत जगु द्या. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. याची तरी लाज बाळगा. हसत्या खेळत्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

इकडे काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा ने त्याचा एक भाऊ जो सध्या ब्रिटन मध्ये वास्तव्य करत आहे. त्याने केनरिन नावाची एक प्राॅडक्शन कंपनी उभी केली. या कंपनीच्या माध्यमातूनच भारतामध्ये व्हिडिओ चित्रित केले जायचे. व्ही ट्रानसफरच्या सहाय्याने ते केनरिन प्राॅडक्शन ला पाठवले जायचे. पण मुळात ही कंपनी स्वतः राज कुंद्रा ची आहे असंही समजतंय.

त्यानेच या कंपनीची स्थापना करून कंपनीची नोंदणी परदेशात केली. कारण भारताच्या सायबर लाॅ पासून संरक्षण करता येईल. असं असताना देखील राखीने राजच्या समर्थनार्थ केलेल विधान सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे आहे.

याबरोबरच राज कुंद्रा च्या अ’टकेनंतर त्याचे काही सोशल मिडियावरचे चॅटिंग देखील व्हायरल झालेले दिसत आहे. व्हाॅट्सपवरच्या चॅटिंग चे हे स्क्रिनशाॅट आहेत. यामधून सुद्धा अनेक गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळत आहे.

त्यामध्ये व्हाॅट्सपवरच्या एका ग्रुप चॅटचा समावेश आहे. एच नावाचा हा ग्रुप असुन या ग्रुपचा ॲडमिन स्वतः राज कुंद्रा आहे. राज कुंद्रा सोबतच या ग्रुपमध्ये राजचे काही नातेवाईक सुद्धा ॲड आहेत. विशेष गोष्ट अशी की या ग्रुपमध्ये एका पाॅ’र्न मुव्ही मेकर कंपनी प्राॅडक्शन हाऊसचे चेअरमन प्रदीप बख्शी हे देखील आहेत. त्यांच्याशी पैशांचा व्यवहार व कंटेंट पोस्टिंग विषयी चर्चा झाल्याचे दिसून येत आहे.

You might also like